BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ सप्टें, २०२२

पंढरपूर - कोर्टी रस्त्यावर अपघात !

 




शोध न्यूज : पंढरपूर - कोर्टी मार्गावर पंढरपूरपासून जवळच दोन वाहनांचा अपघात होऊन दोघे  जण जखमी झाले आहेत. बोलेरो पिकअप आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला आहे. 


पंढरपूर - महूद दरम्यान अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढत असून एक अपघात नुकताच झाला होता आणि आज पुन्हा या मार्गावरच आणखी एक अपघात झाला आहे. या अपघातातील ट्रक हा माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे धान्य घेवून गेला होता. तेथे धान्य खाली करून हा ट्रक पुन्हा पंढरपूरच्या धान्य गोदामाकडे निघालेला असताना हा अपघात झाला. सदर ट्रक गोदामाजवळ आला आणि मुख्य रस्त्यावरून तो गोदामाकडे वळत असताना अपघाताची घटना घडली आहे. (Accident involving two vehicles on Pandharpur-Korti road, Two injured) हा ट्रक अचानक गोदामाकडे वळू लागला त्यामुळे पाठीमागून येत असलेले बोलेरो पिकअप हे वाहन ट्रकच्या मागच्या बाजूस जोरात धडकले. 


समोरचा ट्रक गोदामाकडे वळणार असल्याचे बोलेरो पिकअप चालकाच्या लक्षात आला नाही त्यामुळे तो सरळ येवून ट्रकवर आदळला. पिकअप वेगात असल्यामुळे आणि अचानक ही धडक झाल्यामुळे पिकअप वाहनाचे पुढच्या बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय पिकअप मधील दोघे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पंढरपूर उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात होताच एकदम मोठा आवाज झाला आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. काहीतरी मोठी घटना घडली असल्याची जाणीव या आवाजानेच करून दिली होती. सदर अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती परंतु पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेवून रस्ता रिकामा केला आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !