शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात काळीज गोठविणारी घटना समोर आली असून आईने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केली आहे. या घटनेने बार्शी तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्हा हादरला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे ही धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण परिसराला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. अवघ्या २३ वर्षे वयाच्या मातेने आपल्या पाच आणि तीन वर्षे वयाच्या चिमुकल्या मुलीना घेवून विहिरीत उडी मारल्याची घटना समोर आली आहे. राधा बाबासाहेब काशीद असे या आईचे नाव असून तिने दीड वर्षाचा मुलगा अनिस काशीद आणि सहा महिन्याची मुलगी अक्षरा या यांच्यासह घेवून विहिरीत उडी मारली. यात तिघेही मृत्युमुखी पडले असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले तेंव्हा गावकरी मोठ्या संख्येने जमले होते आणि यात महिलांची संख्या अधिक होती. शेतातील विहिरीच्या परिसरात फक्त आक्रोश ऐकायला येत होता. राधा काशीद यांच्या माहेरचे, खांडवी येथील अनेक लोक यावेळी आलेले होते.
आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी सासरी छळ होत होता त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप नातेवाईक करून लागले आहेत. बार्शी तालुक्यातील खांडवी येथील राधा हिचा २००१ साली विवाह झाला होता आणि सासरच्या लोकांकडून तिचा सतत छळ केला जात होता. शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता तसेच काही रकमेचीही मागणी करण्यात येत होती असा आरोप महादेव सौदागर आणि कोंडीबा वायकुळे यांनी केला आहे. अगोदर अंत्यविधी करून घ्या मग त्यानंतर तक्रार नोंद करू असे पोलिसांनी सांगितले असल्याची देखील माहिती आहे. पांगरी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
गावातील पोलीस पाटील यांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस तातडीने संबंधित शेतातील विहिरीवर पोहोचले (Mother with two children committed suicide in a well) आणि अग्निशामक दलाच्या मदतीने शोध घेवून तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !