BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ सप्टें, २०२२

राज्यात पावसाचा जोर वाढणार, सतर्कतेच्या सूचना !

  



  पंढरपूर परिसरात   
  मुसळधार पाऊस   
               सुरु !           

शोध न्यूज: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. 


गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून पावसाने पुन्हा आगमन केले असून राज्याच्या विविध भागात पाऊस होत आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच व्यक्त केला आहे आणि आता पुन्हा पुढील तीन दिवसांच्या पावसाची मोठी सूचना हवामान खात्याच्या पुणे विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिल्या आहेत. राज्याच्या बहुतेक सर्व भागात हा पाउस पडणार असल्याचे दिसत आहे. पाऊस घेवूनच गणपती बाप्पाचे आगमन झालेले असून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


गुरुवार पासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा हा परिणाम राहणार आहे. पुणे विभाग हवामान विभाग प्रमुख होसाळीकर यांनी ताजे ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नाशिक, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, कोकण, सिंधुदुर्गासह पुणे विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीच राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचे आगमन झाले होते परंतु त्यानंतर अचानक पावसाने दडी मारली होती आणि पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. 


सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने दिलासा मिळाला आहेच परंतु पहिल्या दिवसांपासून राज्यात कुठे ना कुठे पाऊस पडताना दिसू लागला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शेतकरी आता या मेघराजाच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात जवळपास सर्वच जिल्हात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.  


मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याच्या मार्गावर आहे. परंतु मोसमी पावसाच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्रातील अधिकाधिक भागात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस सप्टेंबर  महिन्यात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच दिला आहे. देशभरात सरासरीच्या तुलनेत १०९ टक्के पाऊस या कालावधीत होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. ज्या भागात कमी पाउस झाला आहे आणि आजही पावसाची प्रतीक्षा आहे त्या भागांना दिलासा मिळणार आहे. 


यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने चिंता वाढवली परंतु जुलै महिन्यात त्याची भरपाई केली. जुलै आणि ऑगष्ट महिन्यात राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आणि काही भागात अतिवृष्टी झाली. यावर्षी धरणे लवकर भरली आणि नदी नाले तुडुंब भरून वाहिले आहेत. साहजिकच जमीनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. काही भागात पाउस नको म्हणण्याची वेळ आली तर राज्याच्या काही भागात अजूनही पावसाची मोठी प्रतीक्षा आहे. शेतकरी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. अतिवृष्टीमुळे राज्याच्या काही भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे (The intensity of rain will increase in the state, warning notices) तर काही भागात पाऊस नाही म्हणून पिके धोक्यात आहेत.  राज्यातील सर्वच विभागांना आता या नव्या अंदाजामुळे दिलासा लाभणार आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !