BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ सप्टें, २०२२

इंदुरीकर महाराज कीर्तनातच संतापले आणि --

 



शोध न्यूज : राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात प्रख्यात  कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर हे कीर्तन सुरु असतानाच संतापले आणि त्यांनी कॅमेरामनला खाली उतरवले. 


प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाला विक्रमी गर्दी होत असते, आपल्या कीर्तनातून मनोरंजन करीत ते समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा आणि नव्या पिढीच्या भरकटण्यावर खुसखुशीत भाषेत भाष्य करीत असतात. त्यांच्या कीर्तनाच्या तारखा देखील मिळत नाही एवढी त्यांची लोकप्रियता आहे पण काही वेळा इंदुरीकर महाराज यांच्या काही विधानांवर आक्षेप घेण्यात आला आणि समाज जागृतीचे काम करणाऱ्या इंदुरीकर महाराज यांना कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या, पोलीस ठाण्यात हेलपाटे घालावे लागले. अशा घटनामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच वैतागलेले असून यु ट्यूब मुळे हे सगळे घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 


आपल्या कीर्तनातील वाक्ये तोडून मोडून दाखवली जातात त्यामुळे समाजात गैरसमज पसरतो आणि त्यामुळे कायदेशीर प्रसंगाला देखील तोंड द्यावे लागते. या सगळ्या प्रकाराला वैतागून त्यांनी कीर्तनाच्या कार्यक्रमात व्हिडीओ चित्रणाला बंदी केली होती. परळी येथील धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात कॅमेरे दिसले आणि इंदुरीकर महाराज ( Indurikar Maharaj )भडकले. कीर्तन सुरु असतानाच त्यांचा संताप अनावर झाला. आपल्या कीर्तनात अभंग सादर करीत असतानाच ते कॅमेऱ्यावर भडकले आणि त्यांनी कॅमेरामनला खाली उतरण्याचा इशारा केला. एवढेच नव्हे तर, कॅमेरे बंद केले जावेत म्हणून त्यांनी दम देखील दिला. 


कीर्तन सुरु असताना काही कॅमेरे त्यांचे चित्रण करीत असल्याचे महाराजांना दिसले आणि त्यांचा राग नियंत्रणाबाहेर गेला. "आधी खाली उतरा, तो कॅमेरा देखील काढून टाका, जिरवलीय तुम्ही आमची " असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला. अचानक घडलेला हा प्रसंग पाहून कीर्तन ऐकण्यासाठी जमलेले लोक देखील गडबडले. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjya Munde ) हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. अखेर ते उठले आणि त्यांनी मध्यस्थी करीत इंदूरकर महाराज याना शांत करण्याचा प्रयत्न केला.  


गणेशोत्सवाचा अंतिम दिवस म्हणून नाथ प्रतिष्टानने इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते. यावेळी महाराज कीर्तनासाठी उभे राहिले असता त्यांना समोर कॅमेरा दिसला त्यामुळे त्यांचा संताप झाला. यावेळी त्यांनी कॅमेरा काढून घ्या म्हणत असताना एकाने महाराजांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे महाराज अधिकच भडकले. यु ट्यूब मुळे इंदुरीकर महाराज याना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे कॅमेरा आणि कीर्तनाचे चित्रीकरण करण्यास त्यांनी या आधीच विरोध केला आहे. यु ट्युबर आपली वाक्ये तोडून, जोडून दाखवतात आणि त्यामुळे कायद्याचा प्रश्न निर्माण होता. हे घडू नये म्हणून त्यांनी कीर्तनाच्या कार्यक्रमात कॅमेऱ्यावरच बंदी घातलेली आहे. 


"दोन तासांचे कीर्तन यु ट्यूब वरून दाखवणे काही अडचणीचे नाही पण ते कधीही पूर्ण कीर्तन यु ट्यूब वर टाकणार नाही, इकडलं एक वाक्य आणि दुसरीकडील एक वाक्य घेतात आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागतो" असेही इंदुरीकर महाराज रागारागात म्हणाले.  राष्ट्वादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करीत समजावण्याचा प्रयत्न करीत महाराजांना शांत केले. आठ दिवस थेट यु ट्यूबवरून कार्यक्रम प्रसारित केला आहे, पण नेमका इंदुरीकर महाराज यांचाच कार्यक्रम थेट दाखविला नाही तर त्यांची परिस्थिती नेमकी काय होईल याचा विचार आमच्यासारख्याला करावा लागतो. त्यांना जो व्यवसाय करायचा असेल तो करू द्या, तुम्ही अध्यात्मिक करा आपण एकमेकांचं करू' असे सांगत मुंडे यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न  केला. 


राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचे नाथ प्रतिष्ठान सतत कुठल्या ना कुठल्या विषयावरून चर्चेत राहात आहे. त्यातच इंदुरीकर महाराज यांच्या संतापण्यामुळे आणखी एक विषय मिळाला आहे. (Indurikar Maharaj got angry at the kirtan itself) गणेशोत्सवात केलेल्या सुरुवातीच्या एका कार्यक्रमाबाबत देखील या प्रतिष्ठानवर अनेकांनी टीका केली होती, आता इंदुरीकर महाराज यांच्या भडकण्यामुळे नव्या चर्चेला विषय मिळाला आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !