BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ सप्टें, २०२२

उजनी धरणातून विसर्ग वाढवला !

 


शोध न्यूज : काल वीर धरणातून थोडासा विसर्ग सुरु झाल्यापाठोपाठ उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग देखील वाढविण्यात आला असून नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


यावर्षी पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्यामुळे अपेक्षेच्या आधीच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आणि सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्याची चिंता  मिटली. सोलापूर जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडला नसतानाही पुणे आणि मावळ परिसरातील पावसामुळे उजनी धरणाची तहान भागली गेली. उजनीच्या वरच्या बाजूस असलेली धरणे तुडूंब झाल्यामुळे आता पाउस झाला की या धरणातून पाणी सोडावे लागत आहे. उजनी धरणात देखील पुरेसा जलसंचय झालेला असल्यामुळे उजनीतून पाणी सोडावे लागत आहे. (Increased discharge from Ujani Dam) नदी आणि कालव्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडले जात होते. आता पुन्हा उजनी धरणात पाणी येत असल्यामुळे भीमा नदीच्या पात्रात हे पाणी सोडले जात आहे. 


उजनी धरण ११० टक्के भरलेले आहे आणि धरणात येणारा विसर्ग वाढू लागला आहे, त्यामुळे उजनी धरणातून आज दुपारपासून पन्नास हजार क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडले जाऊ लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीच्या काठावरील शेतकऱ्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे क्षेत्रात मोठा पाउस झाल्यामुळे घोड धरणातून १९ हजार १४०  क्युसेक्सने विसर्ग सोडला जात आहे. हे पाणी थेट दौंड येथे उजनी धरणात येत आहे. घोड पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे आज  सकाळी या धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. त्याचा परिणाम उजनी धरणावर झाला आहे. उजनीमधून सोडण्यात येणारा विसर्ग ५० हजार क्युसेक्स करण्यात आल्याने भीमा नदीची पातळी पुन्हा एकदा वाढणार आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप आदी साहित्य याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !