BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ सप्टें, २०२२

पाठलाग करून अवैध मद्य पकडले, आरोपी मात्र पळाले !



शोध न्यूज :काल सांगोला पोलिसांनी वीस लाखांचा गुटखा पकडला असतानाच सोलापूर जिल्ह्यात आणखी एक कारवाई झाली असून बनावट देशी मद्यासह पाच लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

परराज्यातून महाराष्ट्रात येणारा गुटका अलीकडे सतत पकडला जात असून सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर पोलिसांनी लाखों रुपयांचा गुटका आत्तापर्यंत पकडला आहे. त्याचबरोबर देशी, विदेशी मद्य देखील मोठ्या प्रमाणात पकडले जात असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यात केलेल्या एका कारवाईत पाच लाख बारा हजार रुपये किमतीचे बनावट देशी मद्य पकडले आहे. एका कार मधून हे बनावट मद्य नेले जात असताना बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथे ही कारवाई करण्यात आली. या कारमधून टॅंगो पंच ब्रॅंडच्या बनावट देशी दारूचे ३२ बॉक्स जप्त करण्यात आले आहे.  अवैध दारू वाहतुकीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बार्शी - तुळजापूर मार्गावर उपळे दुमाला गावाच्या हद्दीत सापळा लावण्यात आला. 


सापळा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी 'त्या' गाडीची प्रतीक्षा करीत थांबले असतानाच एक स्विफ्ट डिझायर कार (एम एच १२ एन यू २७५२) भरधाव वेगाने आणि संशयास्पद रीतीने धावताना दिसली.सदर अधिकाऱ्यांनी या गाडीचा पाठलाग केला आणि काही अंतरावर ही कार थांबविण्यास भाग पाडले. या कारमध्ये दोन व्यक्ती होत्या परंतु अधिकाऱ्यांनी गाडी थांबवताच ते दोघेही तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यांना टॅंगो पंच ब्रॅंडच्या ९० मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले ३२ बॉक्स निदर्शनास आले. हे बॉक्स उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले असून त्याची किंमत एक लाख बारा हजार रुपये असून वाहनासह एकूण ५ लाख १२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 


सदर कारमधून पळून गेलेल्या दोन्ही व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. (Illegal liquor was caught after chasing, but the accused ran away) राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूची निर्मिती, वाहतूक, विक्री यावर कारवाई करण्यासाठी सहा पथके नेमण्यात आली असून अशा प्रकाराबाबत माहिती मिळाल्यास संपर्क करावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !