BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ सप्टें, २०२२

फायनान्सच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक !

 


शोध न्यूज : हॅलो, बजाज फायनान्सची एक स्कीम आहे, शून्य टक्के व्याज दराने कर्ज मिळतेय, हवेय काय? असा फोन करून कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवत तब्बल चार लाखांचा गंडा घातल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. 


हल्ली बाजारात फसवणुकीचे अनेक फंडे शोधले जातात आणि गरजू माणूस डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतो आणि तिथेच त्याची फसगत होते. 'अमुक घेतले तर तमुक फ्री', 'मोफत योजना' अशी काही नवे देऊन कुठल्या ना कुठल्या स्कीम बाजारात येत असतात. कुणी काही फुकट देत नसते आणि तोटा करून कुणी कसला धंदा करीत नसते हे उघड सत्य आहे पण तरीही लोक भूलथापा आणि फुकटच्या अमिषाला बळी पडतात. कोण कुणाला कशाला काही फुकट देईल? याचा साधासा विचार देखील कुणी करीत नाहीत आणि त्यात सहजगत्या फसतात. एकदा फसगत झाली की मग पोलीस ठाण्याकडे धाव घेतली जाते. शून्य टक्के व्याज दराने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत सांगोला तालुक्यात ३ लाख ८६ हजार रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. 


एक लाख रुपयांची पॉलिसी घेतली की दहा लाखांचे गृहकर्ज शून्य टक्के व्याजाने देतो अशी  बतावणी करण्यात आली. कुठलीही बँक अथवा फायनान्स कंपन्या एक रुपयांचे व्याज सोडत नाहीत आणि इथे मात्र दहा लाखांचे कर्ज देऊनही शून्य टक्के व्याज ही योजना कुणालाही आकर्षक वाटू शकेल पण यात काही फसवणूक असू शकेल असे मनात देखील येत नाही आणि मग फसवणूक अटळ ठरते. सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील प्रभाकर दत्तू जाधव यांची देखील अशीच फसवणूक झाली आणि मग त्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी अभय चव्हाण आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रभाकर दत्तू जाधव याना नवे घर बांधायचे होते, त्यासाठी त्यांना कर्ज हवे होते पण त्यांना ते उपलबद्ध होत नव्हते. नेमके याच दरम्यान दोन वर्षांपूर्वी जाधव याना एक फोन आला आणि 'आम्ही बजाज फायनान्स मधून बोलत आहोत, तुम्हाला गृहकर्ज हवे आहे का? अशी विचारणा केली. जाधव याना प्रयत्न करूनही कर्ज मिळत नव्हते आणि नेमके याच वेळी कुणी तरी कर्ज द्यायला पुढे आले आहे हे पाहून जाधव याना आनंद होणे स्वाभाविक होते. जाधव यांनी लगेच कर्जासाठी होकार दिला. हीच संधी साधली गेली आणि त्यांना बजाज फायनान्सची एक स्कीम असल्याची बतावणी सुरु झाली. या स्कीमचे फायदे देखील त्यांना पटवून देणे सुरु झाले. 


एका लाखाची पॉलिसी घेतली तर दहा लाख रुपये शून्य टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतरही अभय चव्हाण, सोनाली कदम, रोहित पांडे, विपुल जोशी, रिया, पायल यांनी जाधव यांना अनेकदा फोन केले आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. आपण बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून शून्य टक्के दराने कर्ज देत असल्याचे सांगत एक लाख रुपयांची विमा पॉलिसी काढण्यासाठी प्रवृत्त केले. जाधव यांना त्यांनी पॉलिसी क्रमांकाचे एक बुकलेट देखील पाठवले आणि फसवणुकीचा पुढील प्रकार सुरु झाला. 


ऑनलाईन पॉलिसी आणि दहा लाखांच्या कर्जावर १२ टक्के जीएसटी लागेल असे त्यांनी जाधव यांना सांगून ही रक्कम वाचविण्यासाठी आणखी ८० हजारांची पॉलिसी काढावी लागेल असेही सांगितले. अशा प्रकाराने जाधव यांना ८० हजारापासून कधी वीस तर कधी दहा आणि कधी १ लाख अशा वेगवेगळ्या प्रकाराने एकूण ३ लाकः ८६ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. (Four lakhs fraud in the name of finance) कर्जाच्या गरजेपोटी आणि विश्वास टाकून त्यांनी एवढी रक्कम त्यांच्याकडून खात्यावर भरून घेण्यात आली आणि नंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि संबंधितावर गुन्हा दाखल केला.  


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !