BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ सप्टें, २०२२

आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात, चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी !

 


शोध न्यूज : शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि 'प्रहार' चे प्रमुख बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे.

 
एका जुन्या प्रकरणात गिरगाव न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरोधात अजामीनपात्र वारंट बजावले होते. त्यानुसार ते आज गिरगाव न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी जामीनासाठी अर्ज सादर केला परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांना ताब्यात घेत १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने अजामीनपात्र वारंट काढल्यामुळे आमदार कडून हे आज स्वतः न्यायालयात हजार झाले. राजकीय आंदोलन केलेल्या एका प्रकरणी दाखल गुन्ह्यात ते हजर झाले पण त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेगळून लावला आणि त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.   


सहा वर्षांपूर्वी ३० मार्च २०१६ रोजी मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित याना अर्वाच्च शिवीगाळ करून बच्चू कडू यांनी मारहाण केली होती असा आरोप अधिकारी संघटनेने केला होता आणि या दिवशी दुपारी मंत्रालयात घडलेल्या घटनेचे पडसादही जोरदार उमटले होते.  अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली होती तसेच यावेळी मंत्रालयातील सर्व कमर्चारी अधिकारी यांनी ठिय्या आंदोलनही केले होते. बच्चू कडू आणि सरकारी अधिकारी यांच्यातील संबंध कायमच ताणलेले असतात आणि कडू हे अधिकाऱ्याचा कसलाही मुलाहिजा ठेवत नाहीत हे महाराष्ट्राला माहीत आहे. मंत्रालयात उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याशी त्यांचा असाच वाद झाला होता. 


महाराष्ट्र मंत्रालयीन संघटनेने आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोप केलेले होते. बेकायदेशीर असलेले काम करून घेण्यासाठी त्यांनी उपसचिव गावित यांच्यावर दबाव आणला होता असा देखील हा आरोप होता. या घटनेवरून काँग्रेस सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत हा मुद्दा मांडला होता. त्यावेळी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली होती. बच्चू कडू यांनी मात्र आरोप फेटाळून लावले होते आणि आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केलेली नाही असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले होते. अधिकारी संघटना मात्र अधिकच आक्रमक झाली होती आणि त्यामुळे मरीन लाईन पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  


बच्चू कडू आज न्यायालयात हजर झाले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. (Fourteen days judicial custody to MLA Bachu Kadu) या गुन्ह्यात कडू यांनी पूर्वीच अटकपूर्व जामीन मिळवला होता परंतु आता न्यायालयाने त्यांना ताब्यात घेवून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 


ताजी बातमी : 

गिरगाव न्यायालयाने ताब्यात घेवून न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बच्चू कडू यांनी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना जमीन मंजूर केला आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !