BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ सप्टें, २०२२

बडे प्रस्थ असलेल्या महाराजाला अखेर बेड्या !

 


शोध न्यूज : भोंदूगिरीचे अनेक गुहे दाखल असलेला आणि विनयभंगाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे या महाराजाच्या नावावर अनेक 'उद्योग' आहेत.  स्वत:ला राष्ट्रसंत म्हणवून घेणारा हा लोमटे महाराज या मोठ्या आणि पवित्र उपाधीला देखील बदनाम करीत आहे अशी भावना आता होऊ लगली आहे. दैवी चमत्काराचा मोठा बाजार मांडलेल्या या एकनाथाने भक्त म्हणून आलेल्या महिलेचाच विनयभंग केल्याची तक्रार पिडीत महिलेने पोलिसात केली आणि त्याच्यावर आणखी एक गुन्हा नोंद झाला. येरमाळा पोलीस ठाण्यात २८ जुलै २०२२ रोजी या लोचट महाराजाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि जगाला ज्ञान देण्याचे नाटक करणारा हा एकनाथ लोमटे पोलिसांच्या भीतीने पसार झाला होता. 


एकनाथ लोमटे या संशयित आरोपीवर या आधी भोंदूगिरीचे गंभीर गुन्हे पोलीसात दाखल आहेत. एक महिला त्यांच्या दर्शनासाठी आली तेंव्हा या महिलेचा विनयभंग केला, एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही तर 'तुला मी गुंगीचे औषध दिले होते आणि त्या गुंगीत तुझ्यावर मी बलात्कार देखील केला आहे. त्याचा व्हिडीओ तयार केला आहे' अशी धमकीही लोमटे महाराजाने पिदितेला दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पिडीत महिला त्याच्या धमकीला घाबरली नाही आणि तिने सरळ पोलीस ठाणे गाठून लोमटेच्या विरोधात तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल दाखल होताच या 'बहाद्दर' महाराजाने अज्ञात ठिकाणी पळ काढला.   


गुन्ह्याचे गंभीर स्वरूप असल्यामुळे पोलीस त्याच्या शोधावर होते पण हा कथित महाराज पोलिसांना गुंगारा देत होता. तब्बल ४५ दिवसांच्या नंतर मात्र पोलिसांचे हात त्याच्या कॉलरपर्यंत पोहोचले आणि या महाराजाच्या मुसक्या आवळल्या गेल्या. कळंब तालुक्यात या लोमटे महाराजाचे मोठे प्रस्थ असून मलकापूर येथे त्याचा एक मठ देखील आहे. दैवी शक्तीच्या जोरावर तो लोकांचे आजार बरे करीत असल्याचा लोकांचा विश्वास होता.  त्याचा भक्तगण देखल मोठा असून राजकीय पक्षातील अनेक बडे नेते त्याचे भक्त आहेत. या एकनाथ लोमटे याच्यावरच महिलेने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


गुन्हा दाखल होताच बेपत्ता झालेल्या महाराजाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याला अटक होताच त्याच्या भक्तमंडळीत खळबळ उडाली असून चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला असून या तपासात आणखी असेच काही प्रकार उघडकीस येताहेत का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (Allegation of molestation, absconding Maharaj arrested) महाराजांची बदनामी करण्यासाठी हे सर्व सुरु असल्याचे लोमटे महाराज याचे लहान बंधू यांनी या आधीच दावा केला आहे पण आता तपासात सगळी काही माहिती समोर येणार आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !