BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ सप्टें, २०२२

सरपंच निवडणुकीत वीस लाख पाण्यात, उपसरपंचाला बेदम मारहाण !


 

शोध न्यूज : निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला पण पण तो पाण्यात गेल्याचा राग धरून उपसरपंचाला बेदम मारहाण केल्याची अजब घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. 


निवडणूक आणि पैशाचा पाऊस हे काय समीकरण आहे हे अगदी खेडेगावापर्यंत आणि वाडी वस्त्यांपर्यंत माहित झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तर भलतीच चुरस असते आणि पैशाचा वापर करण्याचे मार्ग ग्रामपंचायत  निवडणुकीत देखील काही प्रमाणात सुरु झाल्याचे प्रकार घडत असतात. अलीकडे मत 'दान' घेतले जाते की मत खरेदी केले जाते यावर बोलावे असे देखील काही उरले नाही अशा प्रतिक्रिया आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळीही ऐकायला मिळतात. प्रचंड पैसा खर्च केला जातो पण नंतर तो वसूल कसा केला जातो ? या प्रश्नाचे उत्तरही आता कुणी शोधत नाही. पाण्यासारखा पैसा खर्च करून निवडून आले  तर ठीक, पण निवडून नाही आल्यावर मात्र अवस्था भलतीच कठीण होत असते. 


'सगळं ओक्के' म्हणणाऱ्या सांगोला तालुक्यात मात्र अशीच एक घटना समोर आली असून सांगोला तालुक्यात काहीच 'ओक्के' नाही असे दिसू लागले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील एक प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत २० लाख रुपये वाया गेले म्हणून एका उपसरपंचाला बेदम चोपले आहे आणि याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली  आहे. उपसरपंच नानासो जालिंदर बंडगर यांनी चार जणांच्या विरोधात ही फिर्याद दिली आहे.  सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदान न केल्याचा हा राग मारहाणीतून बाहेर आला आहे. या प्रकारची चर्चा आता सोलापूर जिल्हाभर सुरु झाली आहे. 


सांगोला तालुक्यातील महिम येथील ग्रामपंचायतीवर नानासो जालिंदर बंडगर यांची सहा महिन्यांपूर्वीच उपसरपंच पदावर निवड झाली आहे.  ग्रामपंचायतीत अर्चना नारनवर या सरपंचपदी  कार्यरत होत्या परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महीम येथील (ग्रामपंचायत) सरपंचपद रिक्त झाल्याने  २६ ऑगस्ट रोजी येथील सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली आणि या पदावर पुन्हा एकदा अर्चना नारनवर यांचीच निवड झाली होती. सरपंच पदाच्या निवडणुकीत मतदान केले नसल्याचा राग धरून चौघांनी मारहाण केल्याची तक्रार उप सरपंच नानासो बंडगर यांनी पोलिसात दिली आहे. 


सांगोला तालुक्यातील महीम येथील किराणा दुकानात ही घटना घडली असून बंडगर यांना "तुझ्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीत २० लाख रुपये पाण्यात गेले, तू गावात लईच पुढारपण करतो" असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले  (Defeated in Sarpanch election, Deputy Sarpanch beaten) असे उपसरपंच जालिंदर बंडगर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.


(A strange incident has taken place in Sangola taluka of Solapur district where the deputy sarpanch was beaten to death because he spent money like water in the election)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !