BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ सप्टें, २०२२

भरधाव कारने बारा भाविकांना चिरडले, सहा ठार !

  



BREAKING


शोध न्यूज : बारा भाविकांना एका भरधाव वेगातील कारने चिरडल्याने मोठा अपघात गुजराथच्या अरावली जिल्यात घडला असून यात सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे.


अरावली जिल्ह्यातील कृष्णापूरजवळ एका भरधाव वेगातील कारने थेट बारा जणांना चिरडले त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. सदर भाविक अंबाजी मंदिरात दर्शनासाठी पायी चालत निघाले होते. यावेळी अत्यंत वेगातील एक कार आली आणि तिने बारा भाविकांना चिरडून टाकले. सदर भाविक हे पंचमहाल जिल्ह्यातील कलोल येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात सहा जण जागेवरच ठार झाले तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची घटना घडताच स्थानिक पोलीस तातडीने दाखल झाले आहेत.


  • अपघात केलेली कार ही महाराष्ट्र पासिंगची असून तिचा क्रमांक एम एच ०३ सी के ०१७८ असा आहे. अपघात नेमका कुठल्या कारणाने झाला याची माहिती मिळाली नाही. 


अपघातात ठार झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून अपघात होताच येथे स्थानिक नागरिक तसेच भाविक यांनी मोठी गर्दी केली आहे. अपघातात कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. कारच्या या अवस्थेवरून कार किती वेगात असेल याचा सहज अंदाज येतो. एखाद्या अवजड वाहनाला जोराची धडक दिल्यानंतर कारची होणारी अवस्था पादचारी भाविकांना धडक दिल्याने झाली आहे. (
Six devotees died on the spot in a car accident)  एकावेळी बारा भाविक चिरडल्याने रक्ताचा सडा पडला आहे तर भाविकांच्या किंकाळ्या परिसरात घुमल्या. बेसावध असलेल्या आणि पायी चालत निघालेल्या या भाविकांवर अचानक काळाचा घाला घातला गेला आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !