BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ सप्टें, २०२२

अखेर 'तो' अकरा दिवसांनी सापडला पण ---

 


शोध न्यूज : 'मिस यु ऑल ऑफ यु' असे स्टेट्स व्हॉटस एपवर ठेवून बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध अकरा दिवसांनी लागला पण दुर्दैवाने त्याचा मृतदेहच मिळाला त्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त करणेच केवळ हाती उरले !


मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील अरुण मधुकर येडवे हा सत्तावीस वर्षे वयाचा तरुण अकरा दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. तत्पूर्वी त्याने आपल्या व्हॉटस ऍपवर "मिस यु ऑल ऑफ यु" असे स्टेट्स ठेवले होते. अचानक अशा प्रकारचे स्टेट्स पाहून त्याचे मित्रही गोंधळून गेले होते. अरुण बेपत्ता असून त्याने ठेवलेले स्टेट्स काही वेगळेच संकेत देत होते त्यामुळे त्याच्या मित्रांनी अरुणच्या कुटुंबियांना या स्टेटस बाबत माहिती दिली. अरुण कुठे गेला हे कुणालाच माहित नव्हते, अरुणच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी अरुणचा शोध सुरु केला. सगळीकडे शोध घेऊनही अरुणच्या काहीच पत्ता मिळत नवहता त्यामुळे हळूहळू चिंता वाढू लागली होती. सर्व शक्य ठिकाणी अरुणची चौकशी केली तरीही त्याच्याबाबत काहीच माहिती हाती येत नव्हती. 


अरुण सापडत नसल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी हराळवाडी तसेच परिसरातील गावातील व्हॉटस ऍप ग्रुपवरून मेसेज दिले. अरुण येडवे हा तरुण बेपत्ता झाला असून त्याच्याबद्धल कुणाला काही माहिती मिळाल्यास अथवा तो कोठे आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन देखील करण्यात आले परंतु याचाही काही उपयोग झाला नाही. काही करून अरुण सापडत नाही म्हटल्यावर त्याचे मित्र आणि नातेवाईक अधिकच चिंतेत सापडले. अरुण याचा सहा महिन्यांपूर्वीच घटस्फोट झालेला होता आणि तो तणावात होता. घटस्फोटामुळे तो निराश झालेला होता. अरुणाला ऑनलाईन रमी खेळण्याचीही सवय होती आणि यातून त्याचा तणाव वाढलेला होता. 


अरुण बेपत्ता झाल्यानंतर अकरा दिवस त्याचा शोध सुरूच होता परंतु अकराव्या दिवशी अरुण याचा मृतदेह गावाच्या शेजारील एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सडून गेलेला त्याचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अरुण येडवे या तरुणाने आत्महत्या केली असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. आत्महत्येपूर्वी त्याने तसा संकेत देणारे स्टेट्स ठेवले होते पण त्याने कसल्याही प्रकारची चिट्ठी लिहून ठेवलेली नव्हती. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मृतदेह आढळून येताच कमती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे जागेवरच शवचिकित्सा करण्यात आली. 


अकरा दिवस शोध घेतला असताना अरुणचा काहीच पत्ता लागला नाही आणि अखेर अकरा दिवसांनी त्याचा मृतदेह आढळला यामुळे त्याचे मित्र शोकाकुल झाले असून कुटुंबाला तर मोठा धक्का बसला आहे. (The dead body of the missing youth was found eleven days later) घटस्फोट झाल्यामुळे आलेली निराशा आणि ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादातून असलेला तणाव यातून ही घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे.        


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !