BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ सप्टें, २०२२

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरून 'तंटा' !



शोध न्यूज : गावात तंटा होऊ नये म्हणून तंटामुक्ती समिती अस्तित्वात आली आहे पण या समितीच्या अध्यक्षपदासाठीच 'तंटा' झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 


गावात भांडणतंटा होऊ नये, काही किरकोळ घटना घडलीच तर आपसात समझौता व्हावा या उदात्त आणि चांगल्या कल्पनेने गावागावी तंटामुक्ती समितीची स्थापना केली जाते. गावागावातील हा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे. गावातच आपसातील तंटा मिटल्याने पोलीस स्टेशन आणि कोर्टकचेऱ्यात हेलपाटे घालावे लागत नाहीत आणि आपसातील संबंध चांगले राहतात, पण गावातील तंटे मिटविण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांची आपसात तंटा सुरु केला आणि या समितीच्या अध्यक्षांची निवड पुढे ढकलण्याची वेळ आली. 


मंगळवेढा तालुक्यात भाळवणी आणि नंदेश्वर येथील ग्रामसभेत महात्मा गांधी  तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार होती. नंदेश्वर येथे या निवडीच्या विषयावरून ग्रामसभा आयोजित करण्यात आला होती. या सभेत काही विषयावर एकमत झाले परंतु तंटामुक्ती समितीच्या निवडीवरून मात्र दुफळी झाली. तंटामुक्त समितीवर अध्यक्ष होण्यासाठी चौघांची इच्छा होती आणि या विषयावरूनच तंटा निर्माण होऊ शकतो याची कल्पना आल्याने आधीच पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. परिस्थितीचा अंदाज आल्याने मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला होता. आणि अंदाजाप्रमाणे या विषयावर तंटा झालाच. 


गावात निर्माण होणारे तंटे मिटविण्यासाठी आपण सक्षम असल्याचे सांगून सरपंचानी समिती अध्यक्ष निवडीचा विषयच तहकूब केला त्यामुळे पुढील वाद वाढला नाही पण तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडीसाठी तंटा असल्याने विषय तहकूब करण्याची ही मोठी नामुष्की ओढवली आहे.  असाच प्रकार भाळवणी गावात देखील घडला आहे. धनाजी चव्हाण आणि सत्यवान जावीर यांची नावे महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदासाठी पुढे आली होती. यातील सत्यवान जावीर यांनी माघार घेतल्याचे धनाजी चव्हाण यांचे एकमेव नाव उरले होते. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असतनाच हा विषय ग्रामसेवकांनी तहकूब केला. यावरून पुन्हा संघर्षाचे वातावरण तयार झाले. समिती अध्यक्षांच्या निवडीचा विषय तहकूब करणार असाल तर सभेतील सगळेच विषय रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तंटामुक्ती समिती अध्यक्षांची निवड करायची नसेल तर ग्रामसभा बोलावालीच कशाला ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.  


तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड करण्याचा विषय ऐनवेळी तहकूब केला गेल्याने गावकरी संतापलेले आहेत. डिसेंबर महिन्यात निवडणुका होत असल्यामुळे गावासाठी तंटामुक्ती समितीला अध्यक्ष असणे आवश्यक आहे पण अध्यक्ष निवडीचा विषय तहकूब केला हे अनेकांना रुचले नाही. (Controversy over selection of president of Tanta Mukti Committee) एकमत होत असतानाही आणि अध्यक्षपदावरून वाद नसतानाही ग्रामसेवकांनी अकारण वाद निर्माण करून ठेवला आहे. अध्यक्षाच्या निवडीवरूनच नवा तंटा निर्माण करण्यात आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !