BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ सप्टें, २०२२

कीर्तनकाराच्या आत्महत्येप्रकरणी पोलीसाविरोधात गुन्हा !

1






शोध न्यूज : एका कीर्तनकाराच्या आत्महत्येप्रकरणी एका पोलिसासह त्याच्या मित्रावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर येथील कीर्तनकारांनी केलेल्या आत्महत्येला आता वेगळेच वळण लागले आहे. 


इंदापूर येथील कीर्तनकार संजय मोरे यांनी चार दिवसांपूर्वी म्हणजे १० सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. राहत्या घरातच त्यांनी गळफास घेतला आणि आपल्या जीवनाचा शेवट केला होता. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती आणि आता चार दिवसांनी इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महादेव जाधव आणि त्याचा एक मित्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसावर अशा प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पुणे ग्रामीण पोलिसात देखील या घटनेबाबत चर्चा सुरु झाली आहे. कीर्तनकार संजय मोरे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या बहिणीने आश्विनी मोरे यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलीस कर्मचारी महादेव जाधव आणि त्याच्या एका अनोळखी मित्राला या आत्महत्येस जबाबदार धरले आहे. त्यानुसार पोलिसांनीही या पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


आत्महत्या होण्याच्या घटनेआधी ८ सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचारी महादेव जाधव आणि त्याचा एक साथीदार हे कीर्तनकार संजय मोरे यांच्या घरी गेले होते आणि त्यांनी 'एका महाराजाच्या मुलीला फोन कशासाठी करतो? असे विचारत जाधव आणि त्याच्या साथीदाराने कीर्तनकार मोरे यांना मारहाण केली आणि शिवीगाळ करीत दमदाटी देखील केली होती. त्यानंतर दोनच दिवसात संजय मोरे यांनी आत्महत्या केली असल्याचे मोरे यांच्या बहिणीने म्हटले आहे. 


यापूर्वीही मारहाण !
मागील महिन्यात याच संशयित आरोपींनी इंदापूरला लागून असलेल्या तापी बिल्डींग येथे नेऊन मारहाण केली होती तसेच कीर्तनकार मोरे यांचे डोके जिन्यावर धरून आपटून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. शिवाय सतत धमक्या देणे, शिवीगाळ करणे सुरूच होते. विविध प्रकाराने कीर्तनकार मोरे यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे.त्यांनीच संजय मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आहे असे अश्विनी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 


गुन्हा दाखल !
अश्विनी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोलीस कर्मचारी महादेव जाधव आणि त्याचा एक मित्र याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०६, ३२३, ५०४. ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Case filed against police for suicide of kirtankara)पोलीस कर्मचारी जाधव याचा अहवाल देखील वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आला आहे. 
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !