BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ सप्टें, २०२२

छप्पर फाडके ...! गणपती बाप्पाने दिली अडीच कोटींची लॉटरी !

 



शोध न्यूज  : 'देव द्यायला लागला की कधी कधी छप्पर फाडके देतो' असे म्हणतात ते काही खोटे नाही, गणेशोत्सवानिमित्त काढलेल्या लॉटरीचा निकाल आला आणि एका व्यावसायिकाला तब्बल अडीच कोटींची लॉटरी लागली. 


'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके ..." असे हिंदी चित्रपटातील एक लोकप्रिय गाणे आहे. या गाण्याचाचा प्रत्यय औरंगाबाद येथे आला आहे औरंगाबाद येथील व्यावसायिक गिरीश पटेल यांना देखील याची प्रचीती आली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने काढलेल्या लॉटरीचे तिकीट पटेल यांनी घेतले होते आणि या लॉटरीने त्यांना तब्बल अडीच लाखांचा प्रसाद दिला आहे. विशेष म्हणजे पटेल यांना पहिल्यांदाच लॉटरी लागली असे नाही तर असे नशीब उघडण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. कुणी आयुष्यभर केवळ लॉटरीची तिकिटे फाडत राहतो पण दोन पाच रुपयांची लॉटरी कधीतरी लागते, कित्येकांच्या नशिबात ते देखील नसते. पटेल यांना या आधी ३ कोटी ५६ लाख रुपयांची लॉटरी लागली होती आणि आता अडीच कोटींची लॉटरी त्यांनाच लागली आहे.  


सिव्हील इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतलेले गिरीश पटेल यांचा ठेकेदारीचा आणि प्रॉपर्टी डिलरचा व्यवसाय आहे. पटेल हे गेल्या नऊ वर्षांपासून लॉटरीचे तिकीट घेतात. पंजाब राज्याच्या लॉटरीने त्यांना पुन्हा मालामाल केले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंजाब मंथली डीअर लॉटरी काढण्यात आली होती. दहा सप्टेंबर रोजी या लॉटरीचा ऑनलाईन निकाल काढला गेला त्यात पहिले अडीच कोटींचे बक्षीस पटेल यांना लागले. या निकालाने पटेल यांचे कुटुंब खुश झाले असून मित्रमंडळीही त्यांचे अभिनंदन करीत आहेत. मोठ्या रकमेची लॉटरी दोन वेळा एकाच व्यक्तीला मिळते याला नशीब म्हणावं की योगायोग? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.   


नशीबवान ठरलेल्या गिरीश पटेल यांनी शहरातील सिद्धिविनायक लॉटरी सेंटर येथून खरेदी केलेल्या तिकिटाला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. "खेलेंगे नही तो, जितेंगे कैसे? असा सवाल पटेल यांनी केला आहे. म्हणूनच आपण डीअर लॉटरीची तिकिटे खरेदी करतो. या आधी जेंव्हा ३ कोटी ५६ लाखांची लॉटरी लागली तेंव्हापासून नियमितपणे आपण तिकिटे खरेदी करीत असल्याचेही पटेल सांगतात. लॉटरीतून मिळालेली रक्कम मुलींच्या वैद्यकीय शिक्षणासाठी खर्च करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. पहिले बक्षीस मिळाल्याबद्धल पटेल यांचा आणि त्यांच्यासोबत लॉटरी सेंटरच्या अजय जैस्वाल यांचाही सत्कार करण्यात आला.


पटेल यांना यापूर्वी १८ ऑगस्ट २०१५ रोजी पहिल्यांदा लॉटरी लागली होती. त्यांना 'थंडरबॉल' लॉटरीचे ३कोटी ५६ लाखांचे बक्षीस मिळाले होते. त्यानंतर गिरीश यांना दुसऱ्यांदा लॉटरीचे पहिले अडीच कोटींचे बक्षीस त्यांना  लागले आहे. म्हणूनच 'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके ..." या गाण्याची अनेकांना आठवण होऊ लागली आहे. (A businessman won a lottery worth crores) ज्यांना गरज आहे त्यांना कधी लॉटरी लागत नाही आणि ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्यांच्याकडेच ही लक्ष्मी पुन्हा एकदा गेली आहे. 


लॉटरी सेंटरवर नेहमीच गर्दी दिसत असते. मोठ्या आशेने लोक तिकीट खरेदी करतात आणि निकाल पाहायला सेंटरवर येतात. निकालाच्या तारखेपर्यंत ही तिकिटे जीवापाड सांभाळत असतात. मोठ्या आशेने निकाल पाहतात आणि निराश होऊन परत जात असतात. आयुष्यभर लॉटरी तिकिटे विकत घेणारे आणि निराशेने परत जाणारे अनेक लोक लॉटरी सेंटरवर रेंगाळत असतात. कधी शेवटचे एक दोन क्रमाक लागलेच तर पाच दहा रुपये घेवून परत जातात. येथे मात्र एकाच व्यक्तीला दोन वेळा आणि ती देखील कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागते. याला नशीब नाहीतर दुसरे काय म्हणायचे ? 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !