BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ सप्टें, २०२२

पंढरपूर - सांगोला रस्त्यावर आणखी एक अपघात !



Title of the document

शोध न्यूज : पंढरपूर - सांगोला रस्त्यावर पुन्हा एक अपघात झाला असून यात एका ठेकेदाराचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत.


पंढरपूर - सांगोला हा रस्ता रुंद आणि चकाचक केल्यापासून या मार्ग मृत्यूचा महामार्ग बनलेला आहे. आजवर अनेक अपघात या मार्गावर झाले असून कित्येकांचे प्राण गेले आहेत. अत्यंत भरधाव आणि बेफिकीरपणे वाहने चालवली जातात आणि अपघात होतात. काही मोठे आणि भीषण स्वरूपाचेही अपघात पंढरपूर - सांगोला रस्त्यावर झाले आहेत तरीही कुणाच्याही वेगावर नियंत्रण आलेले नाही आणि अपघाताची मालिका खंडित व्हायला तयार नाही. वाहतुकीचे नियम पाळायचे असतात हे तर या रस्त्यावर माहितच नसावे अशी परिस्थिती आहे. 


रस्त्यावर कुठेही अवजड वाहने उभी केली जातात आणि रात्रीच्या वेळी ती दुसऱ्या वाहनांना दिसत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून अपघात घडतात. असाच अपघात पुन्हा एकदा या रस्त्यावर घडला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली त्यामुळे एक ठार तर दोघांना जखमी होण्याची वेळ आली आहे. समोरून येत असलेल्या वाहनाचा प्रकाश डोळ्यावर पडत असल्याने रस्त्याच्या बाजूला थांबलेला मालट्रक दुचाकी चालकाला दिसलाच नाही आणि त्यामुळे तो थेट जाऊन ट्रकवर मागच्या बाजूने आदळला.  काम संपवून बांधकाम सोमनाथ तुकाराम सूर्यगण हे सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील  ठेकेदार गवंडी कामगार जागीच ठार झाले. 


पंढरपूर - सांगोला रस्त्यावर बामणी गावाजवळ असणाऱ्या दुध डेअरीच्या परिसरात काल रात्री हा अपघात झाला असून या अपघातात सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथीलच अजित निवृत्ती कांबळे आणि अखिलेश वैजिनाथ लोंढे हे दोघे जखमी झाले आहेत.  जखमी झालेले दोघेही बांधकाम मजूर असून वाडेगाव येथून ते कामासाठी आलेले होते आणि काम संपवून परत आपल्या गावी निघाले होते. मांजरी येथून सांगोल्याच्या दिशेने ते दुचाकीवरून निघाले असताना हा अपघात झाला. जखमींना तातडीने सांगोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


बांधकाम ठेकेदार गवंडी आणि अन्य दोन मजूर हे तिघे एकाच दुचाकीवरून निघाले असताना समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाशझोत दुचाकी चालकाच्या डोळ्यावर पडला त्यामुळे त्याला समोरचे काहीच दिसू शकले नाही आणि नेमके याचवेळी समोर एक ट्रक उभा होता. (Accident Pandharapur Sangola Road, Death of Construction Contractors) तो न दिसल्याने वेगात जाऊन दुचाकी सरळ त्या उभ्या ट्रकवर मागच्या बाजूने आदळली. दुचाकी वेगात असल्याने ट्रकला धडकून खाली पडली. यावेळी एक जण जागीच ठार झाला आणि अन्य दोन जखमी झाले. सदर अपघात प्रकरणी सांगोला पोलिसात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !