BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑग, २०२२

पाठलाग करणारी 'ती' गाडी अखेर सापडली !

 


शोध न्यूज : आमदार विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणारी 'ती' गाडी सापडली असून गाडीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि  अध्यक्ष तसेच आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताच्या घटनेने प्रचंड वादळ उठले आहे. पुणे-  मुंबई रस्त्यावर त्यांच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपात आहे असा आरोप अपघाताच्या पहिल्या तासापासून सुरु झाला आहे. तसा संशय निर्माण व्हावा असे काही घटनाक्रम देखील पुढे आलेले आहेत. विनायक मेटे यांचे कार्यकर्ते, आई, त्यांच्या डॉक्टर पत्नी, शिवसेना खासदार अरविंद सावंत अशा सर्वानीच या घटनेबाबत शंका व्यक्त करून चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. पोलिसांनी त्यानुसार चौकशी सुरु केली आहे. मेटे यांचे दु:खात असलेले नातेवाईक देखील आता समोर येऊ लागले असून ही घटना घातपाताची असल्याचे सांगू लागले आहेत. 

✪ अभिनंदन ! ✪✪➤ ✪➤ लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. विजयमाला सचिन वाळके आणि उपसरपंचपदी संजय साठे यांची निवड.....!, हार्दिक अभिनंदन – सागर सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीटाकळी ✪➤


अपघाताच्या घटनेबाबत संशय व्यक्त होत असतानाच ३ ऑगस्ट रोजी मेटे हे मुंबईला निघालेले असताना शिक्रापूरजवळ त्यांचा अपघात घडविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पुढे आली आणि घातपाताच्या संशयाला बळ मिळाले. मेटे यांच्या गाडीला एका अज्ञात गाडीने दोन वेळा कट मारला असल्याचे या गाडीतील कार्यकर्ते, नातेवाईक यांनी सांगितले. या गाडीतील लोकांच्या हालचाली देखील संशयास्पद असल्याचे कथन करण्यात आले आहे. शिक्रापूर रस्त्यावर मेटे यांच्या गाडीचा दोन किमी पर्यंत पाठलाग करण्यात आला होता असे मेटे यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितले आहे शिवाय त्यानतंर या संदर्भात एक ऑडीओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. 


प्रत्यक्ष अपघात होण्यापूर्वीच हा प्रकार झाल्याने 'ती' कोणती गाडी होती? या गाडीत कोण होते? मेटे यांच्या गाडीचा पाठलाग कशासाठी करण्यात येत होता ? असे अनेक प्रश्न उपस्थित तर होत आहेतच पण त्याच दिवशी अपघात घडविण्याचा डाव होता काय ? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाठलाग करणारी ही गाडी शोधणे महत्वाचे होते आणि पोलिसांच्या पुढे हे एक आव्हान होते. कारण पाठलागाची घटना रात्री ११ वाजता झाल्याचे सांगितले गेले आहे पण या गाडीची बाकी काहीच ओळख उपलब्ध नव्हती. या गाडीचा क्रमांक अथवा फोटो देखील कुणी घेतलेला नव्हता.  पोलिसांनी मात्र वेगाने तपास सुरु ठेवला होता. अखेर रांजणगाव पोलिसांनी सदर गाडी ताब्यात घेतली आहे. 


शिक्रापूर रस्त्यावर विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करीत असलेली ती गाडी ताब्यात घेवून गाडीच्या मालकाला देखील ताब्यात घेतले आहे. गाडीचा मालक आणि चालकाचे नाव संदीप वीर असून आता त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करू लागले आहेत. ३ ऑगस्ट रोजी चालकासह या गाडीत एकूण सहा जण होते अशी माहिती पुढे आली आहे.  ((MLA Vinayak Mete accident, chase car found) यातील सहा जणांपैकी एकाचा वाढदिवस असल्याने हे सर्व शिरूर येथे गेले होते. शिरूर येथे नातेवाईक असल्यामुळे तिकडे गेले होते अशी प्राथमिक माहिती पोलीसाना मिळाली आहे. तरीही पोलीस अधिक तपास करीत आहेत. 


चालकावर संशय !
स्व. मेटे यांचे भाचे असलेले बाळासाहेब चव्हाण यांनी आज अपघात झालेल्या गाडीवरील चालकावर संशय व्यक्त केला आहे. गाडीला अपघात झाला की घातपात झाला याबाबत अद्याप काहीच निष्पन्न झाले नाही पण चालक रोज आपले स्टेटमेंट बदलत आहे. त्याच्या या बदलण्यामुळे आम्हाला शंका येत आहे असे चव्हाण यांनी म्हटले आहे. आम्ही अजून दु:खात आहोत पण तीन दिवसानंतर मीडियासमोर येण्याचे ठरवले असल्याचेही त्यांनी सांगितले.


असा होता पाठलाग !
मेटे यांची गाडी चाललेली असताना मुढे आयशर आणि मागे एक चारचाकी असा पराक्र दोन अडीच किमी सुरु राहिला होता. चार चाकी गाडीतील लोक हातवारे करीत गाडी पुढे थांबवायला सांगत होते. हा प्रकार विनायक मेटे हे देखील पहात होते. त्यांनी चालकाला आपली गाडी हळू घेण्यास आणि त्यांना पुढे जाऊ देण्यास सांगितले होते. 'आपण गाडी बाजूला थांबवून हे कोण आहेत ते पाहू' असे म्हणालो होतो पण त्यांनी 'नको' म्हटले असे कार्यकर्ते मायकर यांनी सांगितले आहे.  


सीआयडी चौकशीचे आदेश !
अपघात झाल्यापासून पोलीस तपास करीत असले तरी या प्रकरणात घातपात झाल्याचा मुद्दा अधिक प्रकर्षाने समोर आला आहे त्यामुळे या घटनेची चौकशी सीआयडी कडे देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक यांना सीआयडी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे हे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. 

  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !