BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ ऑग, २०२२

मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी !

 


शोध न्यूज : मुंबई उडविण्याची धमकी आल्यानंतर आता थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानंद यांचा शिरच्छेद करण्याची मोठी धमकी आल्याने देशभरात खळबळ उडाली असून चिंता देखील व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. 


पाकिस्तानच्या फोन कमांकावरून मुबई पोलिसांना आलेल्या एका संदेशात मुंबई उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ला लोक विसरलेले तर नाहीतच परंतु त्या जखमा अजूनही ताज्या आहेत. दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आली असली तरी अतिरेकी कारवाया म्हटले की मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रत्येकाला आठवतो. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार करण्याची धमकी मिळाली आहे. पोलीस याचा सखोल आणि बारकाईने तपास करीत आहेत. दरम्यान रायगड समुद्रात आढळलेली बोट आणि त्यात सापडलेली शस्त्रे हा विषय चिंताजनक बनला आहे तोच शिर्डी येथे एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्यातच आज आसाम पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना पकडले आहे, देशात असे प्रकार समोर येत असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अत्यंत थरारक धमकी आली आहे. 


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. समाज माध्यामावरून या धमक्या असून त्यांचा शिरच्छेद करण्यात येईल असे म्हटले गेले आहे. मुरादाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुकवर मुरादाबाद पोलिसांच्या नावाने एक खोटे खाते तयार करून त्यावरून धमकीच्या पोस्ट करण्यात आलेल्या आहेत. ज्या पेजवरून या धमक्या देण्यात आल्या आहेत त्या पेजवर पाकिस्तानी झेंडा असून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान याचाही फोटो दिसत आहे. सदर प्रकार एका ट्वीटर वापरकर्त्याने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आणि त्यानंतर सायबर पोलीस सक्रीय झाले आहेत. आत्मप्रकाश पंडित यांच्या नावाच्या खात्यावरून हा प्रकार करण्यात आला असून पोलिस पंडित यांच्यापर्यंत पोहोचले आहेत, आपले खाते कुणीतरी हॅक करून हा प्रकार केला असल्याचे पंडित यांचे म्हणणे आहे. 


अशा प्रकारच्या धमकीने उत्तर प्रदेश हादरले असून पोलीस अत्यंत दक्ष झाले आहेत. पोलीस लवकरच संबंधिताच्यापर्यंत पोहोचतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या अशा घटनामुळे भविष्यात काही घडतेय काय ? याची मात्र टांगती तलवार कायम आहे.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मिळालेली ही धमकी काही पहिली नाही, या आधीदेखील त्यांना धमक्या आल्या असून ही अकरावी धमकी आहे. २४ एप्रिल २०२० रोजी पहिली धमकी मिळाली होती आणि त्यानंतर धमकीचे हे सत्र सुरूच आहे. (
Threat to kill Chief Minister Yogi Adityanath)  पोलिसांनी मात्र ही धमकी गंभीरपणेच घेतली असून शोध सुरु करण्यात आला आहे. 


दहशतवादी अटकेत 
दरम्यान आसाम पोलिसांनी काल रात्री दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या असून हे दहशतवादी अल कायदा इंडियन सब सबकॉन्टिनेंट (एक्यूआयएस) आणि अन्सारुल्ला बांग्ला टीम (एबीटी) यांच्याशी संबंधित असल्याचे पुरावे हाती आले आहेत. आसामच्या गोलपारा जिल्ह्यातून या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे अनेक पुरावे या दोघांकडून पोलीसाना मिळाले आहेत. 



  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !