BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ ऑग, २०२२

यालाच म्हणावं, देव तारी त्याला कोण मारी !







शोध न्यूज : कुणाचं मरण कधी येईल हे काही सांगता येत नाही पण काळ येवूनही वेळ येत नसल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि अनकेदा 'देव तरी त्याला कोण मारी' असं म्हणायची वेळ येते. 


मृत्यू हा अटळ आहे पण त्याच्या दाढेतून वाचल्याची अनेक उदाहरणे घडतात. माणसाचा मृत्यू अगदी सहजही होतो आणि भल्याभल्या संकटातून देखील तो सहीसलामत वाचतो. रत्यावर अपघात होतात आणि माणसांचा जीव जातो, कित्येकदा माणसाकडे मृत्यू चालून येतो पण रस्त्यावर कशीही बेफिकिरी केली तरी माणूस सहीसलामत वाचलेला असतो. कधी देव तरी त्याला कोण मारी  (God will save who will kill him) असं म्हणतात तर कधी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हटले जाते. कधीकधी तर केवळ चमत्कार वाटून जातो. अलीकडे असे व्हिडीओ खूप व्हायरल होतात आणि मोठ्या संख्येने ते पाहिलेही जातात. अनेक अपघातांचे लाइव्ह व्हिडीओ हल्ली उपलब्ध असतात. जागोजागी सीसीटीव्ही असल्यामुळे अपघातांचे दृश्य पुन्हा पुन्हा पाहायला मिळते. 


असाच एक 'चमत्कार' वाटावा असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असून तो मोठ्या संख्येने पाहिलाही जाऊ लागला आहे. एका विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ असून पाहणारा थक्क होऊन जात आहे. अगदी अकस्मात थेट मृत्यूच त्याच्याकडे धावून येतो पण या विद्यार्थ्याला त्याची जाणीवही नसते. तरी देखील हा विद्यार्थी मृत्यूलाही सहज चकवा देवून जात आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हैराण होत आहे. कुणी चमत्कार म्हणत आहे तर कुणी देवाचीच कृपा म्हणत आहे. काही असो, विद्यार्थ्याने थेट आपल्या मृत्यूला चकवा दिल्याचे मात्र या छोट्याशा विडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 


या व्हिडीओत शाळेच्या गणवेशातील एक विद्यार्थी रस्त्यापासून बाजूला उभा दिसत आहे. फुटपाथवरील रेलिंगच्या जवळ एकटा उभा आहे. अचानकपणे आणि काहीही कारण नसताना तो तेथून काही पावले बाजूला जातो आणि त्याच क्षणी एक प्रचंड वेगातील कार येवून रेलींगला धडकते. काही क्षणापूर्वी हा विद्यार्थी जेथे उभा असतो तेथेच नियंत्रण सुटलेली गाडी  येवून आदळते. अचानकपणे हा विद्यार्थी काही पावले बाजूला गेला नसता तर त्याचा मृत्यू नक्की होता. अवघ्या दहा सेकंदात बरेच काही घडून जाते आणि हे कसे घडले हे देखील या विद्यार्थ्याला कळून येत नाही. 


दहा सेकंदात काय घडले हे चित्रित झाले आहे. जेथे हा मुलगा उभा आहे तेथेच सगळे काही घडून जाते. उभा असलेला मुलगा देखील काहीही कारण नसताना रमतगमत उगीचच काही पावले बाजूला सरकतो आणि त्याच क्षणी हा अपघात होतो. हे चित्र पाहिल्यावर कुणालाही हा चमत्कार वाटतो. तुम्हीही म्हणाल,  'देव तारी त्याला कोण मारी ?'  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !