मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या घरी सापडलेले 'ते' दहा लाखांचे पाकीट नक्की कुणाचे ? हा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला असून यामुळे तपास आणखी वेगळ्याच दिशेने जाण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
"गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा.... तुम एक पैसा दे दो, ओ दस लाख देगा.." हे हिंदी चित्रपटातील गीत अजरामर झाले आहे. त्यातच सद्या देशात सुरु असलेल्या संजय राऊत कारवाई प्रकरणातील दहा लाखांचे एक पाकीट चर्चेचे ठरले आहे. अपेक्षेप्रमाणे (Shivasena) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने मध्यरात्री अटक केली असून या अटकेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड केल्यापासून राज्याचे राजकारण तर ढवळून निघालेच आहे परंतु आता ते स्फोटक वळणावर पोहोचले आहे. संजय राऊत यांच्या घरी काल ईडीचे पथक दाखल झाले आणि नऊ तासांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक देखील करण्यात आली.
संजय राऊत यांच्या घरी काहीही आक्षेपार्ह सापडले नसल्याचा दावा राऊत यांच्या बंधूनी केला असून साडे अकरा लाखाची रोख रक्कम सापडली असल्याचे सांगण्यात आले आहे. घरात साडे अकरा लाखांची रक्कम कशासाठी ? हा प्रश्न तपासात उपस्थित करण्यात आला आहे. ईडीने ही रक्कम संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरातून जप्त देखील केली आहे. या प्रकरणात वेगळेच वळण मिळताना दिसत असून या रकमेतील दहा लाख रुपये रक्कम चर्चेची आणि काही प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. दहा लाख रुपयांच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव लिहिलेली माहिती समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सदर रकमेतील दीड लाखांची रक्कम ही घरगुती गरजेसाठी बँकेतून काढून आणल्याचे सांगितले गेले आहे परंतु उरलेले दहा लाख रुपयाच्या नोटांच्या बंडलवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. गेल्या दीड महिन्यापासून शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात अंतर पडलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून भाजपशी हातमिळवणी केली. मुंबई ते सुरत आणि गुवाहाटी तसेच गुवाहाटी ते गोवा आणि मुंबई असा सगळा नाट्यमय प्रवास झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यात मोठी दारी निर्माण झाली आहे. संजय राऊत याना अटक झाल्यानंतर शिंदे गटाने आनंद व्यक्त केला आहे, अशा परिस्थितीत संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या नोटांच्या बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव कसे ? (Suspense of ten lakhs) हा कुणालाही पडणारा स्वाभाविक प्रश्न आहे. दहा लाखांच्या रकमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नेमका कशासाठी? याकडे अनेक नजरा वळलेल्या आहेत.
शिंदे यांचे हात वर !
सदर रक्कम ही पक्षाची असून शिवसेना नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी बाजूला काढून ठेवले असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे पण त्यावर एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांचे नाव कसे ? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रकमेबाबत हात वर केलेले आहेत. सदर रकमेवर आपले नाव कसे? याचे उत्तर संजय राऊत हेच देऊ शकतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
न्यायालयात हजर करणार
दरम्यान संजय राऊत याना मध्यरात्री अटक केल्यानंतर आज त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर राऊत याना न्यायालयात हजर केले जाणार असून ईडीकडून तपासासाठी कोठडी मागितली जाणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे संजय राऊत याना ईडी कोठडी मिळतेय की जामीन मिळतोय याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
खोटा गुन्हा , खोटे पुरावे !
संजय राऊत यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा खोटेपणाने केला असून पुरावे देखील खोटे तयार करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांचे बंडू सुनील राऊत यांनी केला आहे. ईडीला घरात काहीही आक्षेपार्ह मिळालेले नसून आधी दिलेले कागदच त्यांनी पुन्हा एकादशी घेतले आहेत असे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाणार असून राऊत कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !