BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ ऑग, २०२२

म्हणून गणपती मूर्तीच्या डोळ्यातून आले अश्रू !


 शोध न्यूज : सोलापूर येथील गणपतीच्या डोळ्यात कशामुळे पाणी आले ? हा प्रश्न आता निकाली निघाला असून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ही अफवा पुजाऱ्याने कशी पसरवली हे दाखवून दिले आहे. 


काही वर्षांपूर्वी गणपती दूध पिऊ लागल्याच्या अफवेने राज्यभर खळबळ उडवून दिली होती. पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असला तरी अजून गणपती दूध पिल्याची कथा आठवली जाते आणि इतरांना सांगितली जाते. ही बाब केवळ अफवा होती हे नंतर सिद्ध देखील झाले होते. आता पुन्हा सोलापूर येथील एक गणपती रडू लागला आहे, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत असे फोटो वेगाने व्हायरल झाले आणि मोठ्या श्रद्धेने भाविकांनी या मंदिरात गर्दी देखील केली होती. 


व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर बरीच खळबळ उडालीच पण काही लोकांनी गणपती कशासाठी रडत आहे हे देखील सांगून टाकले. मंदिर मोठे करण्यात यावे आणि गणपतीची मूर्ती चांगली बसविण्यात यावी हीच गणपतीबाप्पांची इच्छा आहे, त्यासाठीच मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत असा शोध देखील काहींनी लावला होता. सोलापूर शहराशिवाय जिल्ह्यात देखील या घटनेची चर्चा सुरु झाली होती आणि अनेकांना कुतूहल देखील वाटून गेले होते. 


अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याचवेळी आव्हान करून अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले होते पण काही अंधश्रद्धाळू मंडळी याकडे दुर्लक्ष करून आपलेच मत पुढे रेटत राहिले होते. अखेर आज अंनिस ने यावरील पडदा हटवला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्य कार्यकर्त्यांनी मंदिरातील मूर्तीची पाहणी करून शास्त्रीय कारणे स्पष्ट केली आणि रासायनिक अभिक्रिया हातचलाखीमुळे अशा घटना कशा घडवता येतात हे प्रत्यक्षात दाखवले. यावेळी गावकऱ्याना देखील चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सर्व माहिती दिल्यानंतर गावकऱ्यानी देखील त्यांचे म्हणणे मान्य केले आहे. 


पुजाऱ्याने फोटो आणि व्हिडीओ काढून पसरवलेली अफवा ही केवळ अंधश्रद्धा आहे. नागरिकांनी यापासून सावध राहावे असे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केले आहे. (Superstition of Ganesha crying of Solapur)समितीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी याबाबत जागरुकता निर्माण करून हा प्रकार केवळ आणि केवळ अंधश्रद्धेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !