BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑग, २०२२

ऊसतोड टोळ्यांनी केली चाळीस कोटींची फसवणूक !

 



शोध न्यूज : ऊसाची तोड करणाऱ्या टोळ्या आणि तत्सम व्यवस्था यांच्याकडून राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल चाळीस कोटींची फसवणूक करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 


ऊस तोड कामगार प्रचंड कष्ट घेवून ऊसाची तोड करीत असतात. विदर्भ मराठवाड्यातून ऊसाची तोड करणारे कामागार काही महिने पश्चिम महाराष्ट्रात असतात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रहात विविध आव्हाने झेलत ऊसतोड करीत असतात. हंगाम संपला की परत आपल्या गावी जात असतात. हे कामगार गरीब असले तरी परिस्थिती पाहून शेतकऱ्याची अडवणूकही करीत असतात. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ऊस असल्यामुळे गळीत हंगाम लांबला आणि अनेक टोळ्या परतल्या तेंव्हा उर्वरित टोळ्यांनी शेतकऱ्यांच्या नाकात दम आणला होता. त्यांच्या अपेक्षा तर वाढल्या होत्या पण हव्या तशा मागण्या करीत शेतकऱ्यांना वेठीला धरले होते. ऐनवेळी टोळ्या मिळत नाहीत म्हणून मुकादमाला आधीच आगाऊ रक्कम दिली जाते पण टोळी येतच नाही आणि मुकादम देखील फसवणूक करतो असे अनेक प्रकार दरवर्षी घडत असतात.


घाम गाळून ऊस तोडणारे कामगार काही आपला वेगळा रंग दाखवतातच पण त्यांनी तब्बल चाळीस कोटी रुपयांची टोपी साखर कारखान्यांना (Sugar factory)घातली असल्याची खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील ८१ साखर कारखान्यांची सुमारे ३९ कोटी ८६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. सन २००४ ते २०२० पर्यंत ऊसतोड कामगार आणि तत्सम व्यवस्थेकडून ही फसवणूक झाली आहे.  राज्यातील जवळपास दोनशे साखर कारखाने एकाच वेळी सुरु होत असतात पण त्यापूर्वी कामगार, वाहतूकदार यांच्याशी कारखाने करार करीत असतात. हे कामगार आणि अन्य यंत्रणा मात्र एकाच हंगामासाठी एकापेक्षा अनेक कारखान्यांशी करार करतात आणि कारखान्यांची फसवणूक करतात. यामुळे साखर आयुक्तालयाने एक ॲप विकसित केले आहे. 


वाहतूकदार, मुकादम, तोडणी कामगार यांच्याकडून कारखान्याची फसवणूक होऊ नये म्हणून दोन वर्षे माहिती संकलित करण्यात आली आहे,  विकसित करण्यात आलेल्या ॲपमुळे ऊस तोडणी व्यवहारात अधिक पारदर्शकता आली आहे. महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार या ॲपद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ऊस तोड कामगार आणि तत्सम यंत्रणा यांच्याकडून २००४ ते २०२० या कालावधीत साखर कारखान्यांची ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांची फसवणूक केली असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. राज्यात दहा लाख तोडणी कामगार असून पंचावन्न हजार वाहन मालक आहेत तर पन्नास हजार मुकादम आहेत. एवढी यंत्रणा दरवर्षी कार्यरत असते.  


ऊसाची तोडणी आणि गाळप प्रक्रिया यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ॲपवर ऊसाची नोंद अत्यावश्यक बनली आहे. काही लोक मात्र मुद्दाम खरी माहिती लपवत आहेत त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक होत आहे. (Sugarcane cutting workers have cheated forty crores)तोडणी टोळी आणि मुकादम यांना साखर कारखाने हंगामापूर्वी उचल देतात पण पैसे घेवूनही ऐनवेळी टोळ्या येत नाहीत यामुळे फसवणूक होतेच शिवाय कारखान्यांना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावे लागतात. दरवर्षी अशा फसवणुकीच्या घटना घडत असतात. तब्बल ८१ साखर कारखान्यांची चाळीस कोटींची फसवणूक उघडकीस आल्याने कारखाने हादरले आहेत.  


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !