BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० ऑग, २०२२

कीर्तनासाठी लोक जमले पण इंदुरीकर महाराजच बेपत्ता !



शोध न्यूज : कीर्तनासाठी लोकांची गर्दी जमली पण प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजच आले नसल्यामुळे लोकांची निराशा तर झालीच पण काहींनी थेट पोलिसात धाव घेतली. 


इंदुरीकर महाराज यांचे नाव घेतले तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटते. अत्यंत खुसखुशीत आणि विनोदी शैलीतील कीर्तन महाराष्ट्राला आवडते आणि म्हणूनच त्यांच्या कीर्तनासाठी प्रचंड गर्दी उसळत असते. त्यांचे कीर्तन आयोजित करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु असते पंरतु इंदुरीकर महाराज यांच्या तारखा मिळणे देखील कठीण असते. पुढच्या काही महिन्यांच्या त्यांच्या तारखा आधीच 'बुक' झालेल्या असतात. इंदुरीकर महाराज समाजातील वास्तव खास आपल्या शैलीत मांडतात. सत्य आणि परखड बोलण्यामुळे ते काही वेळा अडचणीत सुद्धा येतात. प्रचंड यश मिळविलेल्या इंदुरीकर महाराज यांना यु ट्यूबवर देखील मोठ्या प्रमाणात पाहिले जाते.  राज्यात अनेक कीर्तनकार आहेत परंतु इंदुरीकर महाराज हे त्यांच्या खास शैलीमुळे लोकप्रिय झालेले आहेत. 


अशा लोकप्रिय झालेल्या इंदुरीकर महाराज यांच्यावर मात्र लोकांची नाराजी ओढवण्याची वेळ आली आहे.  इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केल्यानंतर आयोजकाकडून त्याची मोठी प्रसिद्धी केली जाते. परिसरातील गावात याची जाहिरात होते आणि पंचक्रोशीतील लोक त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी आवर्जून येत असतात. काल बीड येथील कळसंब गावात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते आणि नेहमीप्रमाणे परिसरातील लोक या कीर्तनासाठी जमा झाले होते. कीर्तनाला होत असलेली गर्दी लक्षात घेवून आयोजकांनी सर्व तयारी केली होती. गर्दीने लोक जमा होऊन इंदुरीकर महाराज यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते पण इंदुरीकर महाराज आलेच नाही आणि जमलेल्या गर्दीची प्रचंड निराशा झाली. 


इंदुरीकर महाराज ऐनवेळी न आल्याने लोक नाराज तर झालेच पण काहींचा संताप देखील झाला. कीर्तनाचे मानधन दिलेले असतानाही महाराज आले नाहीत आणि अगदी अखेरच्या क्षणी कीर्तन रद्द करावे लागले, पंचक्रोशीतून आलेल्या लोकांना निराश होऊन परतावे लागले याचा संताप काही गावकऱ्यांनी व्यक्त केला तर काही गावकरी थेट पोलिसांकडे गेले. नाराजी आणि संताप अशा दोन्ही भावना या गावकऱ्यात दिसत होत्या. कीर्तनाची सर्व तयारी झाली असताना अगदी ऐनवेळी इंदुरीकर महाराज येणार नाहीत असे कळताच गावकरी चिडले. आपली फसवणूक झाली असल्याची भावना त्यांची झाली आणि काही संतप्त गावकरी पोलीस ठाण्याकडे धावले. दरम्यान काही स्थानिक कीर्तनकार मध्ये पडले आणि त्यांनी संतापलेल्या गावकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर मात्र गावकरी मंडळींचा संताप काहीसा कमी झाला. 


स्थानिक कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मदतीला धावले त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही अन्यथा इंदुरीकर महाराज यांच्या अडचणी वाढल्या असत्या. तूर्त तरी इंदुरीकर महाराज यांच्यावरील हे संकट टळले आहे. आता इंदुरीकर महाराज हे घेतलेले मानधन परत देतात की कीर्तनासाठी पुढची तारीख देतात याकडे लक्ष लागलेले आहे. (Indurikar Maharaj missing, people angry) ऐनवेळी इंदुरीकर महाराज न येण्यामागे तसे मोठे काही कारण असण्याची शक्यता आहे. त्याचा खुलासा झाल्यावर कदाचित गावकऱ्यांचा राग शांत होऊ शकेल.  


सुपारी ठरली पण --
इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाची सुपारी ठरली होती आणि १९ तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार मंडप उभारण्यात आला होता, भजनी मंडळीही गावात पोहोचली होती. सगळीकडे जाहिरात झाली होती, गावातील लोकांनी वर्गणी गोळा करून एक दीड लाख रुपये जमा केले होते पण ऐनवेळी इंदुरीकर महाराजांनी आजारी असल्याचे कारण सांगितले. संतापलेले गावकरी संतापले आणि 'त्यांना रुग्णालयात घेवून जातो' असे देखील म्हणू लागले.  अख्खं गाव नेकनूर पोलीस ठाण्यात पोहोचले होते. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !