BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० ऑग, २०२२

सोलापूर राष्ट्रवादीला जोरदार धक्का !





शोध न्यूज : राज्यात शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत असताना आता सोलापूर राष्ट्रवादीला देखील जोरदार धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या ३० ते ३५ जणांनी राजीनामे दिले आहेत तर १८ पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत. 


शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार फुटून बाहेर  पडल्यापासून राज्याच्या राजकारणात सुरु झालेली उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाही. शिवसेनेतील आमदार फुटल्यानंतर बारा खासदारांनीही शिंदे गटात जाणे पसंत केले. त्यानंतर राज्यात नाराज असलेले काही जण शिंदे गटात जात आहेत. मंत्रीपद न मिळालेले काही आमदार नाराज असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडी वेगाने होत असतानाच आता राष्ट्रवादीलाही हादरे बसू लागले असून सोलापुरातून काही पदाधिकाऱ्यानी राष्ट्रवादीला सोडले आहे. गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात राष्टवादीत हालचाल सुरु होती पण आज सोलापूर शहरात काही पदाधिकाऱ्यानी हा निर्णय घेवून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

 
सोलापूर शहरातील अठरा पदाधिकाऱ्यानी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि शिंदे गटात प्रवेश केला आहे. पत्रकार परिषद घेवून त्यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पदाधिकाऱ्यानी  पदाचा राजीनामा देत सागर शितोळे यांच्यासह शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या आठ दहा वर्षांपासून आपण आणि आपले सहकरी राष्ट्रवादीचे काम करीत होतो, आंदोलने, मोर्चे यात पुढे होतो पण सत्ता येताच बाहेरचा पालकमंत्री नेमण्यात आला. ते 'मामा' असल्यामुळे मलिदा खाण्यासाठी अनेक 'भाचे' पक्षात आले. क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले तसेच कुठल्याही कमिट्या नेमल्या गेल्या नाही, महापलिकेत देखील कसलेही आंदोलन केले गेले नाही याबाबत सागर शितोळे यांनी प्रश्न उपस्थित केला. 


सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीस ते पस्तीस जणांनी सामुहिक राजीनामे दिले असून हे  सगळे उद्या रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात दाखल होणार आहेत.  उद्या पुण्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असून सदर पदाधिकारी आज पुण्याला रवाना झाले आहेत. सोलापूर महापालिका ताब्यात घेण्याची स्वप्नं पहात असलेल्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून ग्रामीण भागात देखील शिंदे गट हळूहळू का होईना प्रबळ होत चालल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीने वेळीच पावले उचलली नाहीत तर अशी गळती सुरु राहण्याचा धोका जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दिसत आहे.  


सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार देखील राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात जाण्याचे जोरदार वादळ गेल्या काही दिवसात उठले होते. यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती.  आ. शिंदे काही बोलत नसले तरी मौनातून सगळे काही सांगून जात होते. वारंवार त्यांनी या विषयावर 'नो कॉमेंट्स' एवढेच उत्तर दिले पण ठामपणे काही सांगितले नव्हते. आ. शिंदे याना थेट पक्षांतर करणे अडचणीचे ठरणार आहे कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी जाऊ शकते. या अडचणीमुळे सद्या तरी तसे काही घडणार नाही. 


माजी आमदार राजन पाटील यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढली असल्याने त्यांचे हे कथित बंड सद्या तरी शमलेले दिसत आहे परंतु जिल्ह्यात काही तालुक्यात राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी आहे, (Strong blow to Solapur NCP, inclination towards Shinde group) अशा ठिकाणी एका गटाचे पदाधिकारी राष्ट्वादीतून बाहेर पडू शकतात अशी परिस्थिती आहे.   


माजी आमदार गेले !

आजच अकोल्यात देखील राष्ट्रवादीला मोठा दणका बसला असून बाळापुर मतदारसंघातील माजी आमदार बळीराम सिरस्कर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आपल्यासोबत १२० कार्यकर्ते घेवून त्यांनी जाहीरपणे भाजप प्रवेश केला आहे. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !