BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑग, २०२२

शिंदे गटासह भाजपला मोठा हादरा ..... धक्कादायक सर्व्हे समोर !



मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण पाहून अनेकजण भविष्यातील राजकारणावर भाष्य करतात पण इंडिया टुडे आणि सी व्होटर यांनी 'लोकांचा मूढ तपासणारा'  एक सर्व्हे केला असून यातून धक्कादायक आणि चकित करणारी माहिती समोर आली.

 

राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आणि शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार आणि अपक्ष आमदार भाजपाला जाऊन मिळाले. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले आणि त्यानंतर थेट शिवसेनेवरच दावा करू लागले आहेत. आपलीच शिवसेना खरी म्हणत एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले असून कायदेशीर लढाईही सुरु झाली आहे. राज्य सरकारचे भवितव्य अजूनही सर्वोच्च न्यायाल्याच्या निकालावर अवलंबून असले तरी एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेशी थेट दोन हात करण्याचा इरादा दाखवला आहे. एवढेच काय आता दादरमध्येच दुसरे शिवसेना भवन उभा करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. दरम्यान रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर सुरु झालेली अंतर्गत खदखद शिंदे गटाला कमकुवत करण्याचे संकेत मिळत आहेत. 


शिवसेना आणि महाविकास आघाडी यांचे काय होणार? शिवसेना खरोखरच संपली की काय ? शिंदे गटाचे भवितव्य काय ? असे अनेक सवाल सद्या उपस्थित केले जात आहेत. मित्रपक्षाला संपविण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप आणि इतिहास सांगितला जात असताना भविष्यात शिंदे गटाचे भवितव्य काय ? असा प्रश्नही तितकाच महत्वाचा असताना सर्व्हेतून आलेली माहिती ही यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा ठरला आहे. शिवसेना फुटल्यामुळे शिवसेना संपली असा सूर काही जण लावत आहे तर शिवसेना कधीच संपत नसते असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला जात आहे. शिवसेना आता जोमाने कामाला लागली असून शिवसेनेत अनेकांचे प्रवेश होताना दिसत आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बहुसंख्य नेते भाजपात गेले तेंव्हाही राष्ट्रवादी संपली असे म्हटले गेले पण राष्ट्रवादी पुन्हा नव्या दिमाखाने उभी राहिली हा देखील अलीकडचा इतिहास आहे.


राज्यात नुकत्याच झालेल्या उलथापालथीनंतर इंडिया टुडे आणि सी व्होटर यांनी 'मूड ऑफ द नेशन' असा एक सर्व्हे केला असून त्याची धक्कादायक आणि तितकीच चकित करणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील जनतेला शिवसेनेची फोडाफोडी आणि स्थापन झालेले नवे सरकार पटलेले नाही हेच दिसून आले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना जनता समाधानी होती शिवाय मुख्यमंत्री  म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती मिळालेली होती. महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबातील एक घटक आहेत असे वाटून गेले. त्यांना सत्तेतून पायउतार केल्यानंतर जनताही हळहळली होती. त्याचे प्रतिबिंब या सर्व्हेतून समोर आल्याचे दिसत आहे. 


एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी केलेले बंड सामान्य जनतेला आवडलेले नाही हेच या सर्व्हेतून बाहेर आले आहे. आज लोकसभा  निवडणुका झाल्या तर  काय होईल याचे उत्तर या सर्व्हेने दिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीला ४८ पैकी ४२ जागा जिंकता आल्या होत्या. यातील भाजपच्या वाट्याला २३ तर शिवसेनेच्या १८ जागा होत्या. आता शिवसेना आणि भाजप दुरावले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार फुटले आहेत. पण भाजपला आपल्या २३ जागा देखील टिकवता येणार नसल्याचे दिसत आहेत. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे भाजपकडे ४८ पैकी ३७ जागा झाल्या आहेत.  


आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्ष यांना मिळून १८ तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळतील असे या सर्व्हेतून सांगण्यात आले आहे.  राज्यात भाजप आणि शिंदे गट यांच्यापेक्षा युपीए अर्थात महाविकास आघाडीला अधिक पसंती दिली जात असल्याचे दिसत आहे. भाजपने आत्तापासूनच पुढच्या लोकसभेची जुळणी सुरु केली आहे पण बिहारने नुकताच भाजपला मोठा फटका दिला आहे त्यामुळे येथील भाजपच्या २१ जागा कमी झाल्या आहेत. 'मूड ऑफ द नेशन' विचारात घेण्यासाठी फेब्रुवारी २०२२ ते ९ ऑगष्ट २०२२ या काळात हा सर्वे करण्यात आला आहे (Shocking survey by India Today and C Voter) आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ९ ऑगष्ट रोजीच भाजपची साथ सोडलेली आहे. 

  

मोदी यांनाच पसंती 

सदर सर्व्हेत पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांनाच सर्वाधिक पसंती मिळाली आहे. ५३ टक्के लोकांनी मोदी यांना पसंती दिली आहे तर ९ टक्के लोक राहुल गांधी यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ टक्के तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना ५ टक्के आणि अमित शाह यांना ३ टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी पसंती दिली आहे.     

  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !