BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑग, २०२२

आमदाराच्या जावयाने सहा जणांना चिरडले !

 




काँग्रेसच्या आमदारांच्या जावयाने सहा जणांना चिरडले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात करून पळून गेलेल्या आमदार जावयाला पोलिसांनी अटक केली असून या घटनेने संताप व्यक्त होऊ लागला आहे.


गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील सोजीत्राजवळ हा अत्यंत भीषण आणि तिहेरी अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे यातील दोघांचा जागीच तर चार जणांचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला असून यातील तिघे एकाच कुटुंबातील आहेत. कार, दुचाकी आणि रिक्षा अशा तीन वाहनाचा हा अपगःत आहे  एका रिक्षातून चार आणि दुचाकीवरून दोघे प्रवास करीत असताना आमदाराचा जावई असलेल्या कारने त्यांना चिरडले आहे. सदर कार ही काँग्रेस आमदार पूनमभाई परमान यांच्या नावावर असून केतन पादियार हा त्यांचा जावई आहे. अपघात होताच केतन घटनास्थळावरून पळून गेला होता. 


पोलिसांनी केतनच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून तो पळून गेला असला तरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रिक्षातून प्रवास करीत असलेल्या एका महिलेचा आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. दोन्ही बहिणी या आईसोबत आपल्या मामाकडे रक्षाबंधनासाठी गेलेल्या होत्या. (
MLA's son-in-law crushed six people) तेथून परत येत असताना ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले चौघे हे सोजीत्रा येथील रहिवाशी आहेत तर दोघे बोरीअवी येथील आहेत. कारचालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असून चालक देखील जखमी झाला आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !