BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑग, २०२२

थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर !



मुंबई : राज्यातील ६०८ ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला असून सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. 


नुकतीच राज्यातील विविध आणि मुदत संपलेल्या तसेच प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्य पदांसाठी निवडणूक झाली असून त्याचे निकालही घोषित करण्यात आले आहेत. आता सदस्य आणि सरपंच पदासाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून १८ सप्टेंबर रोजी ही निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळेस सरपंच पदाची निवडणूक जनतेतून निवडले जाणार आहेत.(Sarpanch election program announced) त्यासाठी निवडणूक आयुक्त मदान यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी देलेल्या आदेशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. 


सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने निवडणूक घेणे अडचणीचे ठरेल असा मतप्रवाह पुढे आला होता परंतु यावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. ज्या भागात कमी पाऊस असतो अशा भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्यातील ५१ तालुक्यातील ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार असून त्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या निवडणुकीच्या काळात अतिवृष्टी अथवा पुराची परिस्थिती आली तर जिल्हाधिकारी यांना याबाबत त्वरित अहवाल सादर करावेत असे देखील आदेश निवडणूक आयुक्तांनी दिलेले आहेत.

 
निवडणूक कार्यक्रम !
१८ ऑगष्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल, २४ ऑगष्ट ते १ सप्टेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील. या दरम्यान २७, २८ आणि ३१ ऑगष्ट रोजी शासकीय सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. २ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी तर ६ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यांनंतर १८ सप्टेंबरला मतदान होऊन १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. मतदानाची वेळ सकाळी साडे सात ते दुपारी साडे पाच वाजेपर्यंत असणार आहे.  


 या जिल्ह्यात निवडणुका !

धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, हिंगोली, नाशिक, पुणे, अहमदनगर, लातूर, सातारा, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यातील एकूण ६०८ ग्रामपंचायतीत या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.  



  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !