BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ ऑग, २०२२

पंढरीत चोरट्यांनी कॉन्ट्रॅक्टरचे घर फोडले !

 


पंढरपूर : शहरातील उपनगरात पुन्हा एकदा एका ठेकेदाराच्या बंदिस्त घरी चोरी झाली असून या चोरीमुळे नागरिकांत चोरट्यांची दहशत कायम केली आहे.


पंढरपूर शहर आणि उपनगरातून चोरीच्या घटना सतत घडत आहेत. विशेषत: बंद असलेल्या घरात चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे नागरिकांना आपले घर सोडून परगावी जाण्याचे धाडस होत नाही. त्यातूनही आवश्यक कारणासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडले की घर असुरक्षित होत आहे. बंद असलेली घरे आणि दुकाने फोडणाऱ्या टोळीला नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी सापडली त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता आणि आता चोरीच्या घटना कमी होतील अशी आशा वाटू लागली होती. सदर टोळी अजूनही गजाआड असताना बंद घर फोडून ऐवज लुटण्याचा प्रकार पंढरपूर येथील कराड रस्त्यावरील परिचारक नगरात घडला आहे. 


पंढरपूर- कराड मार्गावर असलेल्या परिचारक नगर येथे राहणारे कॉन्ट्रॅक्टर मोहन भुसे यांच्या घराला लावलेले कुलूप तोडून चोरटयांनी आत प्रवेश केला आणि चोरी केली. ठेकेदार मोहन भुसे हे आपल्या कामासाठी सतत बाहेर असतात. ठेकेदार असल्यामुळे त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी कामे सुरु असतात त्यामुळे ते अधिकाधिक घराबाहेर असतात. त्यामुळे परिचारक नगर येथील त्यांच्या घर पत्नी सुप्रिया भुसे आणि त्यांची मुले असतात. रक्षाबंधनासाठी सुप्रिया भुसे आणि मुले सोलापूर येथे गेली आणि ही संधी साधून चोरटयांनी घर फोडून चोरी केली. बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी घरात प्रवेश केला आणि पावणे तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सोन्याची चेन, रिंग,झुबे,चांदीचे पैंजण अशा दागिन्यांचा यात समावेश आहे. 


सुप्रिया भुसे यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने शेजारी अर्चना सुर्वे याना शंका आली आणि त्यांनी लगेच सुप्रिया भुसे याना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर सुप्रिया तातडीने पंढरपूर येथील घरी आल्या असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक तुटलेल्या अवस्थेत होते तर कपाटातील साहित्य देखील अस्ताव्यस्त अवस्थेत होते. (Pandharpur Crime Theft in contractor's house) त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी या चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

  
पाच तोळे चोरीला !
पंढरपूर येथे घडलेल्या घटनेप्रमाणेच बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे घडली असून या चोरीत पाच तोळे सोन्यासह जवळपास सव्वा दोन लाखांची चोरी झाली आहे. महादेव यादव यांच्या फिर्यादीवरून वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महादेव यादव हे रक्षाबंधनासाठी सुनेला तिच्या माहेरी तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे घेऊन गेले होते. त्यांच्या बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील पाच तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपयाची रक्कम असा ऐवज चोरटयांनी पळविला. यात अडीच तोळे सोन्याचे गंठण, दीड टोळ्यांचा हार, एक टोळ्यांची कर्णफुले, झुबे अशा दागिन्यांचा समावेश आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !