BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑग, २०२२

पंढरपूर पोलिसांनी पकडला दहा लाखांचा गुटका !

 


शोध न्यूज : विक्री आणि वाहतुकीस मनाई असलेला अवैध गुटखा पंढरपूर पोलिसांनी पकडला असून या गुटख्याची  किंमत १० लाख ४ हजार रुपयांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 
कायद्याने बंदी असलेला गुटखा आणि अन्य तत्सम पदार्थ यांची वाहतूक केली जात असताना अधूनमधून पोलिसांच्या जाळ्यात हे गुटखा व्यावसायिक आणि वाहतूकदार अडकतात. विशेष म्हणजे हा सर्व गुटखा शेजारील कर्नाटक राज्यातून आल्याने निदर्शनास येते. आत्ताही पंढरपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दहा लाखाहून अधिक किमतीचा गुटका पकडला असून  बंदी असलेला गुटखा आणि वाहन असा मिळून १७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. कर्नाटक राज्यातून सांगोला मार्गाने एक वाहन गुटखा घेवून पुण्याकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या वाहनाला पकडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार पोलिसांना हे वाहन पकडण्यात यश आले आहे. 


विमल आणि आरएमडी कंपनीच्या नावाचा हा गुटखा असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना गुटक्याचे वाहन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. गुटखा घेवून हा टेंपो पुण्याकडे जाणार असून तो सांगोला मार्गे पंढरपूर येथे येत आहे. ही माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावर पाळत ठेवली आणि सापळा लावून थांबले. समजलेल्या वर्णनाचा टेंपो (एम एच १२/ ३६३९) भक्ती मार्गावर येताच त्याला थांबवून पोलिसांनी चौकशी केली,  त्यावेळी या बोलेरो टेंपोत विमल आणि आरएमडी हा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. त्यानतंर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधला गेला.  सदर बाबत पोलीस ठाण्यात येवून तपासणी करण्याची विनंती पोलिसांनी केली असता अन्न व औषध प्रशासनाचे एक पथक आले आणि त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली. यात दहा लाख चार हजार रुपयांचा गुटखा असल्याचे निश्चित झाले. 


सदर प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरु केला आहे. (Pandharpur police caught gutka worth ten lakhs) पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांच्या हाती हे मोठे घबाड लागले आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !