BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑग, २०२२

चॉकलेटचे आमिष दाखवून कोवळ्या बालिकेवर अत्याचार ! नराधमाला बेड्या !



शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील नराधमाने सातारा जिल्ह्यात जाऊन केलेले पाप उघडकीस आले असून साडे तीन वर्षांच्या कोवळ्या बालिकेवर पाशवी अत्याचार करणारा नराधम हा सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.


सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एका गावातील केवळ साडे तीन वर्षांचे वय असलेल्या बालिकेवर अत्याचार करून नराधम पळून गेला होता. तो राक्षस सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील प्रमोद अंकुश लोखंडे (वय ४०) हाच असल्याचे उघडकीस आले आहे. वेळापूर येथील प्रमोद लोखंडे हा बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शेतातील गडी म्हणून कामासाठी आला होता. शेतातील काम करताना त्याने अवघ्या साडे तीन वर्षांच्या बालिकेवर पाशवी अत्याचार केला. चॉकलेट देण्याचे अमिष दाखवत या नराधमाने तिला जनावरांच्या गोठ्यात नेले आणि तेथे तिच्यावर अत्यंत क्रूरपणे राक्षसी वृत्तीने अत्याचार केला. हा प्रकार केल्यानंतर तो तेथून पळून गेला. या कोवळ्या बालिकेच्या कुटुंबाला एकूण प्रकार समाजाला तेंव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यांनी तडक बोरगाव पोलीस ठाणे गाठले. 


बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली, या गुन्ह्याचा तपास पुलिस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांच्याकडे सोपविण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता संशयित आरोपी प्रमोद लोखंडे याचा मोबाईल घटनास्थळीच आढळून आला त्यामुळे तातडीने त्याचे लोकेशन काढणे कठीण होते. त्याचा मोबाईल चुकून घटनास्थळीच राहून गेला होता आणि त्याने मात्र पोलिसांच्या भीतीने तेथून पळ काढला होता. शेतात काम करतो म्हणून तो येथे पोहोचला होता पण त्याने शेतातील काम करण्याऐवजी दुसरेच पाप केले होते. 


दरम्यान नराधमाच्या शोधासाठी बोरगाव पोलिसांनी एक पथक तयार केले होते. लोखंडेच्या शोध घेत पोलीस त्याच्या गावापर्यंत जाऊन धडकले पण तेथेही तो आढळून आला नाही. पोलीस शोध घेत होते पण नराधम पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलीस सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील त्याच्या घरी पोहोचले . हुलकावण्या देणारा प्रमोद घरातच होता त्यामुळे बोरगाव पोलिसांनी वेळापूर येथे जाऊन नराधमाच्या मुसक्या आवळल्या. 


कुणाच्या गरिबीची आणि गरजेची दया करणे देखील महागात पडू शकते हे या घटनेने दिसून आले. काम मागण्यासाठी आलेल्या या नराधमाला शेतात कामाला ठेवले आणि त्याने हा दुसराच उद्योग करून ठेवला त्यामुळे बोरगाव परिसरात प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. (A minor girl was raped by the lure of chocolate)  साडे तीन वर्षे वयाच्या बालिकेला जग कळण्याआधीच जग किती भयानक आहे याची जाणीव या नराधमामुळे झाली असून बालिकेच्या कुटुंबालाही मोठा मानसिक धक्का बसला आहे.     

  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !