BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑग, २०२२

भोगावे लागेल ! समीर वानखेडे यांना ठार मारण्याची धमकी !



शोध न्यूज : अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाला ड्रग प्रकरणी अटक केलेले एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मोठी धमकी आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

 

गेल्या वर्षभरात समीर वानखेडे या नाव देशाला माहित झाले आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अटक केली होती. हा विषय राज्यातच नाही तर देशपातळीवर गाजला होता आणि वानखेडे यांच्याविषयी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांची बदली देखील करण्यात आली परंतु राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप करून त्यांनी आरक्षित जागेवर अधिकारीपद प्राप्त केले आहे. ही शासनाची फसवणूक केल्याचे सांगत मलिक यांनी अनेक कागदपत्रे जाहीर केली होती. यानंतर हे प्रकरण जात पडताळणी समितीकडे गेले होते. 


जात पडताळणी समितीने समीर वानखेडे या जन्माने हिंदू आहेत, जन्माने ते मुस्लीम असल्याचे सिद्ध होत नाही असा निर्णय दिला आणि वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी समीर वानखेडे यांनी मलिक यांच्याविरुद्ध तक्रार करून मानहानीचा दावा दाखल केला. पोलिसात मलिक यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल होताच दुसऱ्याच दिवशी वानखेडे यांना  धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने ट्वीट करून ही धमकी दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वानखेडे यांना धमकीचा मेसेज आल्यानंतर त्यांनी त्याला उत्तरही दिले आहे परंतु काही तासात अज्ञात व्यक्तीने हे ट्वीट डिलीट केले आहे.


समीर वानखेडे यांनी या धमकीबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. "जे केले त्याचे परिणाम भोगावे लागतील' असा हा मेसेज आहे. पोलीस या एकूण प्रकरणाचा तपास करू लागले आहेत. वानखेडे यांनी ड्रग प्रकरणी आर्यन खान याला अटक केल्याने ते देशभरात चर्चेत आले होते तसेच राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला देखील त्यांनी अटक केलेली होती. (Big threat to former NCB officer Sameer Wankhede) त्यांनी वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचा आरोप केला होता. नवाब मलिक हे सद्या ईडी कारवाईचा सामना करीत असून अटक केल्यापासून अद्याप ते तुरुंगात आहेत. अद्याप त्यांना जामीन मिळालेला नाही.   


  • "तुमको पता है , तुमने क्या किया है? इसका तुम्हे भुगतान करना होगा .. तुमको खत्म कर देंगे" अशी धमकी समीर वानखेडे यांना आली आहे.

 

मलिक यानाही धमकी !

वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यातील वाद देशभर चर्चेचे ठरले होते. नवाब मलिक यानाही मागील वर्षी धमकी आली होती. वानखेडे यांचा संदर्भ असलेल्या या धमकीवर मलिक यांनी विविध आरोप केले होते. "एनसीबी चे समीर वानखेडे यांना टार्गेट करू नका, अन्यथा ठार मारू" अशा प्रकारची धमकी आल्यावर नबाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.  

 

  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !