BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ ऑग, २०२२

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस !



मुंबई : काहीशी उघडीप मिळाल्यानंतर राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झालेला असून अनेक भागात या पावसाने जोरदार धिंगाणाही घातला आहे. नद्या, नाले तुडुंब भरू वाहिले असून विविध धरणांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मुसळधार पाऊस आणि विजा पडण्यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून थोडीशी उघडीप मिळाली परंतु आता पुन्हा पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊसधारा कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची संततधार सुरूच आहे त्यात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तसेच बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. आज ७ आणि ८ ऑगष्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून तसा इशाराच हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर आज काही ठिकाणी अति मुसळधार तर उद्या ८ ते १० ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथा यासाठी पुढील पाच दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरासाठी देखील हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. 


आज आणि उद्यासाठी विदर्भात मोठा पाउस होणार असून दोन दिवसांसाठी येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  ऑगस्ट महिन्यात मुंबईसह उत्तर कोकणात देखील पावसात मोठी वाढ होण्याचा अंदाज असून विदर्भात आजपासून पुढील तीन दिवसात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Heavy rains for the next five days) हवामान विभागाचा अंदाज विचारात घेता सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !