BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ ऑग, २०२२

टक्केवारी मागणाऱ्या ग्रामसेवकास अटक !

 


माढा : रस्त्याच्या कामात टक्केवारी मागणाऱ्या ग्रामसेवकाच्या मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवळल्या असून माढा (Madha) तालुक्यातील या ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. 


महसूल, पोलीस विभागातील अनेकजण लाचलुचपत प्रकरणात अडकताना दिसतात. शिपायापासून साहेबांपर्यंत अनेकजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात अलगद अडकले आणि तुरुंगाच्या पिंजऱ्यात जाऊन बसले आहेत. सरकारी बाबू रोज कुठे ना कुठे लाच घेताना सापडताना दिसतात पण आता ग्रामसेवकसुद्धा अशा प्रकरणात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. अनेक अधिकारी टक्केवारीच्या मोहात गोत्यात आले आहेत परंतु आता माढा तालुक्यातील एक ग्रामसेवक देखील अडकला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 

 

पालखी मार्गाच्या काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवक हनुमंत कदम याने कमिशन म्हणून तीन टक्के रकमेची मागणी केली असल्याचा आरोप आहे. शासकीय योजनेंच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत माढा तालुक्यातील उजनी येथे पालखीमार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले होते. ठेकेदाराने या कामाचे बिल काढण्याची मागणी केली असता ग्रामसेवक हनुमंत कदम याने तीन टक्के कमिशनची मागणी केली. एकूण बिलाच्या ३ टक्के प्रमाणे ही रक्कम ८ हजार ४०० रुपये होत होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.  

 

सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली होती आणि या पडताळणीत ग्रामसेवक हनुमंत कदम याने ही रक्कम मागितली असल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कारवाई सुरु करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवकाला ताब्यात घेवून त्याला अटक करण्यात आली आहे. (Gram sevak arrested for demand percentage) ग्रामसेवकाने कमिशन मागितल्याची चर्चा आता माढा तालुक्यात चांगलीच रंगू लागली आहे.   


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !