BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑग, २०२२

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १७० जणांवर हद्दपारीची कारवाई !

 


शोध न्यूज : सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली असतानाच हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील १७० जनावर हद्दपारीची कारवाई केली आहे.


गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील अत्यंत जिव्हाळ्याचा उत्सव असून दहा दिवस चालणारा हा उत्सव विनाविघ्न पार पडावा यासाठी पोलीस आणि प्रशासन प्रयत्न करीत असते. आनंदी उत्सवाला कसलेही गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाच्या पातळीवर शक्य ती सर्व खबरदारी घेण्यात येत असते. या उत्सवात काही समाजविघातक आनंदावर विरझण टाकण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु पोलिसांनी आधीच त्यांचा 'बंदोबस्त' केला असून पंढरपूर शहर आणि तालुक्यातील अशा प्रवृत्तींना चाप लावला आहे. शहर आणि तालुक्यातील १७० जणांवर  तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे तर २७८ जणांच्या विरोधात तात्पुरते स्थानबध्द करण्यात आले आहे. दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या दोनशे जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 


पंढरपूर शहरात ८९ सार्वजनिक गणेश मंडळानी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूर्वक साजरा करण्याचे ठरवले असून अशा गणेशोत्सव मंडळांना नगरपालिकेच्या वतीने बक्षिसे दिली जाणार आहेत असे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले आहे. नगरपालिकेचे एक पथक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देवून पाहणी करणार आहेत, यात पर्यावरणाची जनजागृती, पर्यावरणपुरक वातावरणनिर्मिती तसेच  पर्यावरणपुरक असलेल्या गोष्टींचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. पहिल्या तीन क्रमांकास अनुक्रमे पाच, तीन आणि दोन हजार रुपयांचे बक्षीस देवून या मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे. पंढरपूर शहरातील गणेशोत्सव, विसर्जन याचे संपूर्ण नियोजन प्रशासनाने केलेले आहे. विसर्जन मूर्ती संकलन करण्यासाठी शहरात काही ठिकाणी आणि नदीच्या पात्रात मिळून ११ संकलन केंद्र उभारली जाणार आहेत. गणेश मंडळानी स्टेज, मंडप उभारताना रस्त्यावर खड्डे पाडल्यास मात्र त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.  


  • गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून ९ हजार ५५४ जणांच्या विरोधात कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आलेल्या असून यात ग्रामीण विभागातील ४ हजार ९१८ तर शहरातील ६३६ जणांचा समावेश आहे. वारंवार सांगून देखील सुधारणा झाली नाही अशा ७ जणांचा स्थानबद्ध तर ४० जणांना हद्दपार करण्यात आले आहे. 



पंढरपूर विभागात ३८५ सार्वजनिक गणेशोत्सव मांडले असून १६ गावात 'एक गाव, एक गणपती' संकल्पना राबविली जात आहे अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे. सामाजिक शांतता राहण्यासाठी पोलिसांनी गणेशभक्तांना आवाहन केले असून वादग्रस्त विषयावर देखावे सादर केले जाऊ नयेत याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत. कसल्याची प्रकारचे आक्षेपार्ह फ्लेक लावले जाऊ नयेत अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. 


सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी लावलेल्या ध्वनिक्षेपकाचा आवाज ७५ डेसिबलपेक्षा अधिक ठेवला तर त्यांचावर कारवाई करण्यात येईल अशी सक्त सूचना देण्यात आलीच आहे परंतु शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील पाच चांगल्या गणेशोत्सव मंडळांना पोलिसांच्या वतीने बक्षिसे दिली जाणार आहेत. (Deportation action in the background of Ganeshotsav) गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष असल्याचेही पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !