BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑग, २०२२

टाकळीतील अवैध व्यवसाय बंद करण्याचा ग्रामसभेचा निर्णय !



शोध न्यूज ( अनिल सोनवणे ) :  पंढरपूर शहराच्या लगत असलेल्या लक्ष्मी टाकळी येथील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय टाकळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला असून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. 


पंढरपूर शहराला लागून टाकळी हद्दीत अनेक उपनगरे वसलेली आहेत, टाकळी गाव आणि वसाहत यांची लोकसंख्या मोठी असून काही नागरी समस्या कायम आहेत. टाकळी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली असून सरपचपदी सौ. विजयमाला सचिन वाळके आणि उप सरपंच पदावर संजय देविदास साठे यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतरची पहिलीच ग्रामसभा सरपंच विजयमाला वाळके यांच्या अध्यक्षतेखाली दत्त मंदिरात आयोजित करण्यात आली होती. 


या ग्रामसभेसाठी टाकळी ग्रामपंचायत सदस्य संदीप मांडवे, समाधान देठे, गोवर्धन देठे, सागर सोनवणे, औदुंबर ढोणे, सागर कारंडे, सौ. रेश्मा संजय साठे, सौ. रोहिणी महेश साठे, आशाबाई देवकाते, विकास देवकते, यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे, माजी सरपंच बापूसाहेब कदम, माजी उपसरपंच महादेव देठे, माजी उपसरपंच सचिन वाळके, पोलीस पाटील सौ. गीतांजली गजानन इरकर, तलाठी शिंदे, माऊली देशमुख, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुरज कदम, निलेश चंदनशिवे, शिशीकांत देठे, सौ. भोसले, विश्वजित नवगिरे, सौ. जयश्री वाघमारे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


या ग्रामसभेत टाकळी येथील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. टाकळी येथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहेत आणि यामुळे अनेक प्रकारे नागरिकांना त्रास होत असतो. वर्षानुवर्षे हे अवैध व्यवसाय सुरु आहेत आणि यात वाढच होत चालली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत काही नागरिकांनी लक्ष वेधले. (Gram Sabha's decision to close the illegal business in Takli) त्यामुळे टाकळी हद्दीतील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी नेटाने पाठपुरावा करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला आहे. 


उघड्या गटारी आणि अस्वच्छता याकडेही लक्ष वेधले गेले. यासाठी डास प्रतिबंधक गप्पी माशांची पैदास करणे, आमदार निधीतून गावठाण आणि नवीन वसाहतीत खडीकरण, डांबरीकरण करणे,  ग्रामपंचायत मालकीच्या गायरान क्षेत्रात क्रीडांगण तयार करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे, डिलिव्हरी रूम बांधणे, गावठाण कडेने रस्ता खडीकरण करणे, दलित वस्तीत बंदिस्त गटार करणे,  कॉक्रीट रस्ता करणे, नागरिक सुविधा योजनेतून गणपती नगर, लहूजी वस्ताद नगर ओपन स्पेस सुशोभीकरण करणे, ठक्कर बप्पा योजनेतून पारधी वस्तीत अंतर्गत गटारीचे काम करणे, दिवाबत्ती सुविधा, जंतुनाशक फवारणी यासह टाकळी ग्रामपंचायतीची नगरपंचायत करणे इत्यादी विषय हाती घेण्याचे या ग्रामसभेत ठरविण्यात आले आहे. 


सदर ग्रामसभा ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ग्रामविकास अधिकारी अशोक पांढरे यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांचे स्वागत केले. या सभेत वेळी ग्रामस्थांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी उत्तरे देत ग्रामस्थांचे समाधान केले.ग्रामपंचायतीचा कारभार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक करण्याचा विश्वास सरपंच सौ विजयमाला वाळके आणि ग्रामविकास अधिकारी पांढरे यांनी दिला . 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !