BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑग, २०२२

असा झाला होता इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात !



 


शोध न्यूज : अपघात ही नित्याची बाब झाली आहे पण सर्वात मोठा एक विमान अपघात झाला होता आणि या अपघातात तब्बल ५८३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जग हादरले होते.


काही वर्षांपूर्वी अपघाताचे प्रमाण नगण्य होते. दुचाकीवरून पडून कुणी जखमी झाला तरी त्याची बातमी होत होते. ही बातमी लोक अवार्जुन वाचत होते पण आता अपघात ही नित्याची बाब झाली असून रोज अनेक अपघात घडतात आणि कित्येकांचे प्राण जातात. लोक अशा बातम्या वाचतात, पाहतात आणि आपल्या नित्याच्या कामाला लागतात. अपघाताची घटना आता फारशी गंभीरपणेही घेतली जात नाही. लहान आणि मोठेही अपघात रोज घडतात आणि रोज निष्पाप लोकांचे जीव जातात. रोजचीच ही बाब असल्याने केवळ एका बातमीपुरता विषय बनतो. रस्त्यावर तर अपघात होतातच पण विमान, हेलिकॉप्टर यांचे देखील अपघात अधूनमधून सुरूच असतात. 


सोमवारी मुंबई विमानतळावर एक विमान दुर्घटनाग्रस्त होता होता वाचले आहे. विमान उतरत असताना विमानाचा टायर फुटला आणि यामुळे मोठा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या अपघाताची शक्यता असताना सुदैवाने दुर्घटना घडली  नाही आणि सुरक्षितपणे विमान स्थिर झाले. विमानातील सर्व प्रवाशी तसेच कर्मचारी सुरक्षित आहेत. स्पाईसजेट कंपनीचं बोईंग ७२७-८०० (SpiceJet Boeing 737-800) हे विमान दिल्लीहून मुंबईकडे येत होते. मुख्य धावपट्टी क्र. २७ वर ते आल्यानंतर तपासणी केली असता विमानाचे टायर पंक्चर झालेले आणि फाटलेल्या अवस्थेत आढळले. त्यामुळे प्रवाशी विमानाची मोठी दुर्घटना टळल्याचे दिसून आले.  


रस्त्यावर अपघात झाले तर वाचण्याची काहीशी शक्यता तरी असते पण हेलिकॉप्टर आणि विमानाच्या अपघातातून बचावणे ही केवळ अशक्य बाब असते. विमानाला आकाशात काही झाले आणि ते कोसळले तर सर्व प्रवाशांचा मृत्यू हा ठरलेला असतो. तरी देखील विमान प्रवासाची अनेकांना हौस असते. आवश्यक बाब म्हणून विमानाने प्रवास करावाच लागतो पण कधीतरी एकदा विमानात बसण्याची अनेकांची इच्छा अनावर होत असते. हा प्रवास वेगवान, सोयीचा असतोच पण तितकाच तो धोकादायक देखील असतो. विमानाचा अपघात झाला तर फारच कमी वेळा प्रवाशांचा जीव वाचल्याचा काही मोजक्या घटना आहेत. विमानाच्या इंजिनात होणार बिघाड, खराब हवामान अशा कुठल्याही गोष्टीमुळे विमानाचा अपघात होत असतो. 

   
आजवर विमानाचे अनेक अपघात झालेले आहेत. हवेतून उंच उडताना होणारे अपघात अधिक असले तरी धावपट्टीवर देखील हे अपघात होत असतात. २७ मार्च १९७७ रोजी असा एक अपघात झाला होता की या अपघाताने संपूर्ण जगालाच हादरवून टाकले होते. विमानाच्या या अपघातात तब्बल ५८३ प्रवाशी मृत्युमुखी पडले होते. (
The biggest plane crash in history) हा अपघात आकाशात नव्हे तर जमीनीवर झाला होता. धावपट्टीवर धावताना अचानक दोन विमाने समोरासमोर आली आणि त्यांच्यात जोराची टक्कर झाली होती. या अपघातात एका विमानातील सगळेच्या सगळे प्रवासी मृत्युमुखी पडले होते तर दुसऱ्या विमानातील काही प्रवाशांचे प्राण वाचले होते. स्पेनमधील बेटावरील विमानतळावर ही घटना घडली होती. याच भागात दहशतवादी हल्ला झाला होता त्यामुळे विमानतळावरील सर्व विमाने अन्यत्र वळविण्यात आली होती. याच गोंधळात दोन विमानांना चुकीचे सिग्नल मिळाले आणि त्यामुळे ही विमाने परस्परांना धडकली.  


विमानतळावर काही वेळेपूर्वीच एक दहशतवादी स्फोट झाला होता त्यामुळे विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला होता. या गोंधळाच्या वातावरणातच विमानांना चुकीचे सिग्नल दिले गेले आणि अपघात झाला. यातील एका विमानात २४८ तर दुसऱ्या विमानात ३३५ प्रवासी बसलेले होते, यातील केवळ ६४ प्रवासी सुदैवाने बचावले आणि बाकीचे सगळे ठार झाले होते. (
This was the biggest plane crash) इतिहासातील हा सर्वात मोठा अपघात मानला जात असून त्याची आठवण देखील आजही अनेकांच्या अंगावर रोमांच उभे करीत आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !