BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ ऑग, २०२२

शिवसेना खासदार संजय राऊत ईडी कोठडीतून मुक्त !

 



मुंबई : शिवसेनेचे खासदार हे आज ईडी च्या कोठडीतून मुक्त झाले असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामना' चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या मुंबईतील घरी धाड टाकून तब्बल ९ तास चौकशी केली होती आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर कार्यालयात नेण्यात आले होते आणि तेथील प्रक्रिया पूर्ण करून मध्यरात्री अटक केली होती. खोटे पुरावे आणि खोटा गुन्हा असल्याचे संजय राउत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत हे सतत सांगत होते. न्यायालयाने राऊत यांना सुरुवातीला कोठडी दिली होती आणि पुन्हा एकदा त्यांना कोठडीत वाढ करण्यात आली होती. आज त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. 


संजय राऊत यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहेच पण काल त्यांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. (Court custody of Shiv Sena MP Sanjay Raut) आजही न्यायालयात जाताना संजय राऊत यांचा आत्मविश्वास वाढलेला असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून दिसत होते. आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी दिली आहे त्यामुळे ते आता जामीन मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. 


राऊत यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आता जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नबाव मलिक यांना देखील अटक करण्यात आली होती आणि ईडी कोठडीच्या नंतर त्यांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली आहे परंतु अनेकदा प्रयत्न करून देखील न्यायालयाने त्यांना जमीन दिलेला नाही त्यामुळे संजय राऊत यांच्याबाबत काय घडेल याचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही. 


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !