BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ ऑग, २०२२

अजितदादांना शपथविधीचे निमंत्रणच नाही !


मुंबई : राज्याचा रखडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याचे आज सकाळपासून सांगितले जात असून विरोधी पक्ष नेते असलेले अजितदादा पवार यांना अद्याप निमंत्रणच नसल्याचे खुद्द अजितदादानीच सांगितले आहे. 


राज्याच्या राजकारणात मोठे प्रदूषण सुरु झाले असून सत्तेसाठी काहीही हा प्रकार राज्यातील जनतेलाही रुचला नसल्याचे दिसत आहे. शिवसेना फोडून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वादात सापडले असून मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असे ते रोज सांगत आहेत पण प्रत्यक्षात मुहूर्त निघत नसल्याचे राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. जनतेच्या कामापेक्षा सत्ता किती महत्वाची आहे हेच पुन्हा पुन्हा दिसत असून सत्तेच्या भोवतीच सत्ता केंद्रित झाले असल्याचे दिसत आहे. 


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली दरबारी दुय्यम वागणूक मिळत असल्याने महाराष्ट्र संतापला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागच्या रांगेत उभे केल्याचा फोटो देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील नापसंती व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षासह शिंदे गटाने याचेही समर्थन केले आहे परंतु वस्तुस्थिती समोर आलीच आहे. सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्यात आली पण हळूहळू एकेक रंग दिसू लागले आहेत आणि न्यायालयाच्या निर्णयावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने हे सरकार टिकेल की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यातच रखडलेला मंत्रीमंडळाचा उद्या विस्तार होत असल्याचे सांगितले गेले आहे. 


संभाव्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची यादी तयार असल्याचेही गेल्या काही दिवसांपासून सांगितले जात आहे. आजही ही यादी बाहेर आल्याचे सांगितले जात आहे आणि त्यात काही नावे देखील समोर आली आहेत. शिंदे गटातील दहा जणांची नावे माध्यमातून सांगितली गेली आहेत आणि याचवेळी पावसाळी अधिवेशन देखील पुढे जाईल असा कयास लावला जात आहे. उद्या मंत्रीमंडळ विस्तार होत असला तरी अजूनही राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शपथविधीचे निमंत्रणच नाही, राजभवनात उद्या सकाळी ११ वाजता मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे पण अजितदादा यांना निमंत्रण मिळाले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विस्तार आणि शपथविधी याबाबत अधिकृतरित्या आपणास काहीच माहित नसून एकूण हालचालीवरून उद्या शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे वाटत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. 


विधानसभेतील विरोधी पक्षनेते हे पद मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत महत्वाचे असते त्यामुळे त्यांना निमंत्रण मिळणे ही अत्यावश्यक बाब आहे. असे असले तरी त्यांना आज सायंकाळपर्यंत निमंत्रण मिळाले नव्हते. उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत आपणास अधिकृत काही कळविण्यात आलेले नसून शपथविधीचे निमंत्रण आपल्याला मिळाले नाही असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रीमंडळ विस्तार असेल तर आम्हाला निमंत्रण दिले जाते पण अजून तरी ते आलेले नाही. कदाचित रात्री उशिरा देतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आजत्यांच्या नंदनवन निवासस्थानी  बैठक झाली आहे त्यावरून उद्या विस्तार होईल असे वाटते पण तसे अधिकृत आपल्याला काही कळवलेले नाही. असे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे. 


राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनाच अद्याप निमंत्रण नाही आणि माध्यमातून विस्ताराबाबत सविस्तर माहिती राज्याला मिळत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनाच अधिकृत माहिती नसल्यामुळे विस्तार उद्या होणार आहे की नाही याबाबत संभ्रम निर्माण होत असून राजकारणात उलट सुलट चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.  (Cabinet expansion tomorrow,Opposition Leaders Unaware) यामुळे एकंदर काय परिस्थिती आहे याचेच हे प्रदर्शन होऊ लागले आहे. 


यांची वर्णी निश्चित ! 

एकूण बारा ते पंधरा मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात असून यात भाजपचे चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगुंटीवार, गिरीश महाजन यांची नावे निश्चित मानली जात आहेत. राजभवनावर साधेपणे हा विधी साजरा होणार आहे.   


मित्रपक्षाचे काय ?

शिंदे गटातील आणि भाजपातील जेष्ठ नेत्यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चिली जात असली तरी मित्रपक्षाचे काय ? असा सवाल उपस्थित होत असून रासपचे महादेव जानकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली असून भाजपने मित्रपक्षांचा सन्मान ठेवावा असे म्हटले आहे.   



  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !