BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑग, २०२२

'आले रे आले, गद्दार आले', 'पन्नास खोके, एकदम ओके' च्या घोषणा !

 


शोध न्यूज : पन्नास खोके, एकदम ओक्के, आले आले, गद्दार आले अशा घोषणांनी आज विरोधाकाई विधानमंडळाचा परिसर दुमदुमून टाकला आणि बंडखोर आमदारांना 'गद्दार' म्हणत शिवसनेने पुन्हा एकदा डिवचले.


शिवसेनेत बंडाळी करून एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार बाहेर पडले आणि भाजपशी सोबत घेवून राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेतून हे आमदार फुटले तेंव्हापासून त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारला आणि प्रत्येक आमदार पन्नाल कोटी घेवून शिवसेनेतून फुटले असल्याचा आरोप केला. बंडखोर आमदारांना सतत 'गद्दार' असे संबोधले जात असून ही उपमा शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांना सहन होत नसल्याचेही दिसून आले. 'आम्ही गद्दार नसून आम्ही म्हणजेच शिवसेना आहे' असे हे आमदार वारंवार सांगत आहेत परंतु त्यांच्यावर आता 'गद्दार' असाच शिक्का शिवसेनेने कायम केला आहे. आज या सर्व आमदार एकत्र असताना पुन्हा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला. 


राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले आणि आजपासून नव्या सरकारचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. यावेळी विरोधक आक्रमक होणार आणि अधिवेशन वादळी होणार याचे संकेत आधीपासून मिळत होतेच आणि आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच त्याचा प्रत्यय देखील आला. सकाळपासून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सगळेच विरोधक विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करीत होते. सरकार आणि शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत होते.  एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला जात होता. त्यांनी पन्नास कोटी घेतल्याचा आरोप आधीच केला गेला होता त्यावर 'पन्नास खोके, एकदम ओक्के" अशा घोषणा दिल्या जात होत्या. 


  • 'पन्नास खोके, एकदम ओके' अशा घोषणा दिल्या जात असताना शिंदे गटातील आमदार तेथे आले त्यावेळी विरोधकांनी घोषणांचा जोर वाढवला. विरोधकांनी 'पन्नास खोके ..." ची घोषणा दिली तेंव्हा शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई विरोधकांना म्हणाले, 'पाहिजे का '? 

विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरु असताना एकनाथ शिंदे गटातील आमदार विधान भवनात जाण्यासाठी आले असता एकदम "आले रे आले, गद्दार आले' तसेच 'ईडी सरकार, हाय हाय' अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत होत्या. ('Ale Re Ale, Gaddar Ale', Pannas khoke, ekadam ok) ''एकूणच यावेळचे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरणार असून विरोधक त्यांना चांगलेच घेरणार असल्याचे दिसत आहे. आज सुरु झालेले हे अधिवेशन २५ ऑगष्ट पर्यंत चालणार आहे त्यामुळे पुढील काही दिवस आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसणार आहेत.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !