BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑग, २०२२

आ. स्व. विनायक मेटे यांच्या अपघाताला वेगळे वळण !

 


शोध न्यूज : शिवसंग्राम चे नेते आणि आमदार यांच्या अपघाताबाबत नवनवे अपडेट येत असताना मेटे यांचा चालक समाधान वाघमारे याने दिलेल्या माहितीमुळे या घटनेला वेगळे वळण मिळू लागले आहे. 


आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत संशयाचे प्रचंड वादळ उठलेले असून स्व. विनायक मेटे यांचे कार्यकर्ते, पत्नी, आई आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांनीच शंका आणि संशय व्यक्त केला आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास तर सुरूच आहे पण नवनवी माहिती आता समोर येताना दिसत आहे. मेटे यांच्या कारचा चालक एकनाथ कदम हा देखील या तपासात केंद्रस्थानी आहे. विनायक मेटे यांच्या पत्नींनी देखील 'चालक कदम आमच्यापासून काही लपवतोय असे वाटत आहे' असे म्हटले आहे त्यामुळे अपघातावेळी गाडी चालवत असलेल्या चालकाला देखील पोलीस अटक करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तपासात चालक हा सतत विसंगत बोलत असून त्याने मेटे यांच्या पत्नींना देखील अपघाताची माहिती आणि ठिकाण देणे टाळले होते, एवढेच काय, अपघात झाल्याची माहिती देखील त्याने दिलेली नव्हती.


सदर अपघाताबाबत वेगवेगळ्या शंका कुशंका घेतल्या जात असतानाच ३ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर रस्त्यावर मेटे यांच्या गाडीचा पाठलाग झाल्याची मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळीच मेटे यांचा अपघात घडविण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले आहे त्यामुळे पुणे - मुंबई रस्त्यावर झालेला मेटे यांचा अपघाती मृत्यू अधिकच संशयास्पद ठरला आहे. हे प्रकरण वाटते तेवढे साधे सरळ निश्चित नाही हे आता जवळपास स्पष्ट होत आहे. मेटे यांच्या गाडीचा चालक काय सांगतोय याकडे लक्ष लागलेले असताना चालक असलेल्या समाधान वाघमारे याने यापूर्वीच्या घटनेकडे लक्ष वेधले आहे आणि त्या चौकशीत बरेच काही बाहेर येईल असे म्हटले आहे. 


शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास त्यातून खूप काही बाहेर येईल असे सांगत वाघमारे याने काही माहिती दिली आहे. चालक समाधान वाघमारे याच्या वडिलांचे १४ ऑगस्ट रोजी वर्षश्राद्ध असल्यामुळे ते सुट्टीवर होते. अपघाताच्या दिवशी आपण गाडीवर असतो तर आपला जीव दिला असता पण मेटे साहेबांना काही होऊ दिले नसते. ३ ऑगस्ट रोजी घाईघाईने आम्ही मुंबईला निघालो होतो आमची गाडी ताशी ८० च्या वेगाने निघाली होती, त्यावेळी शिक्रापूरजवळच आमच्या गाडीला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा कट मारला होता.  ही गाडी अत्यंत वेगात होती आणि तिचा वेग १२० च्या आसपास असावा. यावेळी गाडीत मेटे साहेब, आपण आणि सुरक्षा रक्षक ढोबळे, कार्यकर्ते आण्णा मायकर हे होते असे वाघमारे यांनी सांगितले. 


शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीचीव्हीची तपासणी केली तर बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात. दीड हजार किमी गाडी चालवली पण आपण कधी झोपलो नाही आणि झोप आलाय तरी तसे सांगत होतो. गाडीचा अपघात झाला तेंव्हा दोनच एअरबॅग उघडल्या गेल्या पण मागच्या एअरबॅग कशा उघडल्या नाहीत याचे आश्चर्य वाटते असे वाघमारे यांनी सांगितले आहे. याअपघाताबाबत सतत वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत (MLA Vinayak Mete's accident took a different turn) त्यामुळे एकूण प्रकरण विविध वळणे घेताना दिसत आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !