BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ ऑग, २०२२

चार चाकी गाडी पुलावरून थेट पडली खाली !




सोलापूर : येथून देवदर्शनासाठी म्हणून गेलेली चारचाकी पुलावरून थेट बंधाऱ्याचा पाण्यात पडून अपघात झाला असून या अपघातात तिघे व्यापारी गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप करणायत आला आहे. 


चार पाच दिवसापूर्वीच पंढरपूर - सातारा मार्गावर गोंदवले खुर्द परिसरात मोठा अपघात होऊन तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चर्चा सुरु असतानाच गोंदवले खुर्द येथेच हा आणखी एक अपघात झाला आहे. सोलापूर येथून आडत व्यापारी एम एच १३ डी इ ९२१९ या कारने देवदर्शनासाठी निघाले होते. शेळगी  येथील बसवराज महादेव झुरळे, हणमंत सुखदेव रुपनर, आप्पासो नामदेव काळे, वैजनाथ तुकाराम काळे हे आडत व्यापारी देवदर्शन करण्यासाठी म्हणून गोंदवले येथे निघाले होते परंतु गोंदवले खुर्द येथे पोहोचल्यावर चालकाचा ताबा सुटला आणि पुलावरून सुमारे वीस फुट खाली ही कार कोसळली. (Accident Swift car fell off the bridge) पुलावरून थेट बंधाऱ्यात ही कार कोसळून चार चाकीमधील तीन व्यापारी गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. 

 
रस्त्याची कामे सर्वत्र सुरु असून अर्धवट कामामुळे आणि ठेकेदाराच्या बेफिकिरीमुळे सगळीकडे अपघात होताना दिसत आहेत. मध्येच अर्धवट सोडलेले काम, मातीचे ढीग यामुळे चालकाच्या लक्षात येण्यापूर्वीच अपघात होत आहेत. या अपघाताची परिस्थिती देखील अशीच आहे. लातूर- सातारा महामार्गावर गोंदवले खुर्द गावाजवळ असलेल्या वाघाच्या ओढ्यावर पुलाचे काम अर्धवट आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे या परिसरातील रस्ता अत्यंत धोकादायक बनलेला आहे. काही डागडुजी करण्यासाठी ठेकेदाराने येथे मुरूम टाकलेला होता पण हा मुरमाचा रस्ता जास्तच धोकादायक झाला आणि हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.  सोलापूरची स्विफ्ट कार शिलवंत वस्तीजवळ  असलेल्या वाघाचा ओढा येथे पोहोचली तेंव्हा या रस्त्यावर टाकलेल्या मुरुमांचा नेमका अंदाज चालकाला आला नाही. 


स्विफ्ट चालकाचा अंदाज चुकला आणि त्याचा कारवरील ताबा सुटला. यामुळे अर्धवट काम झालेल्या पुलाला टक्कर मारून ही कार वीस फूट उंचीवरून थेट खाली कोसळली. पुलाला दिलेली धडक एवढी जोरात होती की पुलाचे लोखंडी गज देखील तुटून पडले आणि कारचे काही भाग देखील तुटून आजूबाजूला विखरून पडले. पुलाला टक्कर दिली गेल्याने कार थेट पुलावरून खाली गेली आणि कारमधील वैजनाथ तुकाराम काळे (वय ४१), हणमंत सुखदेव रुपणर (वय ५२), आप्पासाहेब नामदेव काळे (वय ५१) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून कारचा चालक बसवराज महादेव झुरळे  (वय २७) मात्र सुदैवाने बचावला आहे. मंगळवारीच या परिसरात झालेल्या अपघातात तीन तरुणांचा प्राण गेला होता, त्यानंतर याच परिसरात हा आणखी एक अपघात झाला आहे. त्यामुळे रस्ता ठेकेदाराकडे बोट दाखवले जाऊ लागले असून संताप देखील व्यक्त होत आहे.    


घसरली गाडी !

रस्त्यावर टाकलेल्या मुरुमावरून गाडी घसरली आणि थेट पुलाच्या पिलरवर आदळली. तेथून ती थेट वीस फुट खाली कोसळली. बंधाऱ्यात पाणी असल्यामुळे ती पाण्यात पडली. यावेळी तेथे असलेल्या कामगारांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि जखमींना मदत केली. गाडीत असलेल्या आणि जखमी झालेल्या या व्यापाऱ्यांना या कामगारांनी गाडीच्या बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. 


मुरूम टाकला पण -- !

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुरूम टाकलेला आहे आणि या मुरुमावर रोलर फिरवलेला नव्हता त्यामुळेच हा अपघात झाला. विशेष म्हणजे रस्त्यावर येथे काम सुरु असल्याचा कसलाही फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहन चालकाच्या काहीच लक्षात येत नाही. त्यातूनच हा अपघात झाला आहे. पुढे काम चालू आहे याची कसलीही कल्पना चालकांना येत नाही आणि अशा प्रकारचे अपघात होत आहेत त्यामुळे संताप व्यक्त होऊ लागला आहे. 



अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !