BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ ऑग, २०२२

पेट्रोल पंपावरच पेटली बुलेट आणि क्षणार्धात ---

 



शोध न्यूज : पेट्रोल पंपावरच एका बुलेटला आग लागली आणि क्षणार्धात ही बुलेट आगीने लपेटली गेली आणि जागीच  तिचा कोळसा झाला. या आगीने अनेकांची बोबडी वळाली होती. 


केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यात देखील रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या अचानक पेट घेतात आणि जागेवर जळून खाक होतात. चालकाने प्रसंगावधान राखले तर अशा वेळी प्रवाशांचे प्राण वाचतात. धावती गाडी पेटणे हे अत्यंत धोकादायक असते आणि सतत अशा प्रकरच्या घटना घडत राहतात. पेट्रोल पंपावर अशी घटना घडली तर ती अत्यंत धोकादायक असते. पेट्रोल पंपावर आग लागली तर मोठा अनर्थ अटळ असतो. पंपावर सर्व दृष्टीने काळजी घेतलेली असते पण तरीही अशी घटना घडणारच नाही असे मात्र नक्की नाही. नाशिक येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेली एक बुलेट अचानक पेटली आणि पंपावरच आगीचे लोळ उठले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 


नाशिकच्या येवला येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी एक बुलेट आली. या बुलेटवरून दोघे जण आले होते. बुलेटमध्ये पेट्रोल भरले आणि तेथून निघण्यासाठी बुलेट सुरु करण्यात आली. जागेवरून हलताच गाडीने पेट घेतला. गाडीला आग लागत असल्याची जाणीव होताच बुलेटवरील दोघेही खाली उतरले. गाडीकडे पहिले आणि ते बाजूला गेले. अवघ्या काही क्षणात संपूर्ण बुलेटचा ताबा आगीने घेतला आणि पेट्रोल पंपावर आगीचे लोळ उठले. पेट्रोल पंपावरच ही घटना घडल्याने परिसरात देखील प्रचंड घबराट उडाली आणि अनेकजण सैरावैरा झाले. पेट्रोल पंप पेटण्याची भीती होती एवढ्या जवळ ही बुलेट पेटलेली होती. 


पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंग पाहून वेळीच धावपळ केली आणि काही वेळाने या आगीवर नियंत्रण मिळवले. (A bullet caught fire at a petrol pump)तोपर्यंत पेटलेली बुलेट जळून खाक झाली होती.  कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते अशी परिस्थिती आणि भीती निर्माण झालेली होती. पंपावर येत असलेले ग्राहक लांबूनच पळून जात होते तर परिसरातील लोक भयभीत झाले होते. प्रचंड तणाव आणि चिंता निर्माण झालेली असताना कर्मचाऱ्याचे प्रसंगावधान कामाला आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !