सोलापूर : अल्पवयीन मुलीला तिघांनी एका वाहनातून पळवून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात मुलीना पळवून नेण्याचे प्रकार शहरी आणि ग्रामीण भागात देखील वाढत असून यात अल्पवयीन मुलीना पळविण्याचेच प्रकार अधिक होताना दिसत आहेत. पोलिसांना हे अधिकचे काम लागले असून पोलीस अशा मुलीना शोधून नातेवाईकांच्या स्वाधीन करतात आणि आरोपींना गजाआड करतात. कित्येक मुलींचा तर शोधही लागत नाही. कधी हे प्रकार ठरवून असतात परंतु अल्पवयीन मुलगी असते तेंव्हा तरुण कायद्याच्या कचाट्यात अडकत असतात. सातत्याने असे प्रकार घडत असतानाच सोलापूर शहरातून एका १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा प्रकार घडला असून पोलीस शोध घेत आहेत.
सोलापुरातील निराळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अरविंद धाम (जुना पुना नाका परिसर) येथून एका वाहनातून सोळा वर्षाच्या मुलीस तिघांनी पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. सदर मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. (A minor girl was abducted by three men) या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील राजंणी येथील नितीन साहेबराव शिंदे, महेश पोपट दांडगे यांच्यासह अन्य एकाच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित बेपत्ता !
पंढरपूर तालुक्यातील तिघेही संशयित आरोपी बेपत्ता असून पोलीस या तिघांचा आणि अल्पवयीन मुलींचा शोध घेत आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले असून हे पथक रांजणी येथील त्यांच्या घरी देखील धडकले पण त्या तिघांचा शोध लागला नाही. संशयित आरोपी पोलिसांना त्यांच्या घरीही आढळून आले नाहीत शिवाय त्यांचे फोन देखील बंद आहेत. संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सायबर पोलिसांची देखील मदत घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !