BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ जुलै, २०२२

मतदार ओळखपत्र आधारशी होणार लिंक !



मुंबई : मतदार ओळखपत्र आता आधार कार्डाशी लिंक करावे लागणार असून येत्या १ ऑगष्टपासून राज्यभर ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. 


आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे आवश्यक केल्यानंतर मतदार ओळखपत्रदेखील आधार कार्डाशी लिंक करावे लागणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु झाली होती. मतदार ओळखपत्राच्या सत्यतेबाबत प्रत्येक निवडणुकीवेळी काही आक्षेप येतात तसेच अनेकांची मतदार ओळखपत्र शंकेच्या आणि संशयाच्या जाळ्यात अडकत असतात. काही मतदार वेगवेगळ्या ठिकाणी मतदार ओळखपत्र काढत असतात आणि यामुळे दोन किंवा अधिक ठिकाणी मतदान केले जाण्याचा धोका असतो. एक व्यक्तीकडे वेगवेगळी ओळखपत्र असली तरी ते लक्षात येणे सहज शक्य होत नाही. निवडणूक सुधारणेचा कार्यक्रम नेहमी हाती घेतला जातो आणि आता आधार - मतदार ओळखपत्र लिंक करणे हा देखील निवडणूक सुधारणा कार्यक्रमाचाच एक भाग आहे. 


निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्राच्याद्वारे निवडणूक डेटाशी आधार कार्ड लिंक करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. एका व्यक्तीच्या नवे दोन किंवा अधिक मतदार ओळखपत्र असतील तर ती काढून टाकण्याच्या हेतूने हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ( (linking voter id cards with aadhaar card from 1 august) निवडणुकीची प्रक्रिया त्रुटीमुक्त व्हावी यासाठी सुधारित कायदा करण्यात आला असून कोणत्याही व्यक्तीला निवडणूक नोंदणी अधिकारी आधार क्रमांक मागू शकतात. आधार कार्ड अथवा आधार क्रमांक हा ओळखीचा पुरावा असला तरी तो नागरिकत्वाचा आधार नाही असे एका खटल्यात सर्वोच्च न्यायालायने सांगितलेले आहे.   


आधार कार्डाशी मतदार ओळखपत्र लिंक केल्याने एकाच व्यक्तीने एकाच मतदारसंघात अथवा अन्य मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नोंदणी केली असल्यास ते सहज शोधणे सोपे होणार आहे त्यामुळे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक केले जाणार आहे. येत्या १ ऑगष्ट पासून भारत निवडणूक आयोग संपूर्ण राज्यात लिंक करण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. महाराष्ट्र निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली असून यामुळे मतदाराचा खाजगी आणि व्यक्तिगत डेटा वैधानिक प्राधिकरणाला उपलब्ध होणार आहे त्यामुळे मतदारावर आपोआप मर्यादा लागू होणार आहेत. आधार तपशील सादर करून मतदारांना आता निवडणूक नोंदणी अधिकारी यांच्यासमोर आपली ओळख द्यावी लागणार आहे. आजवर केवळ चर्चेत असलेला हा विषय आता प्रत्यक्षात उतरत असून येत्या १ ऑगष्टपासून लिंक करण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. 

.

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !