BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ जुलै, २०२२

ऊसाच्या पिकांत शेतकऱ्याने केली गांजाची लागवड !

 


मोहोळ : ऊसाच्या पिकात शेतकऱ्याने गांजाची लागवड केली परंतु पोलिसांना मिळाली माहिती आणि पोलिसांनी धाड टाकून सगळेच भांडे फोडल्याची घटना मोहोळ तालुक्यातील वटवटे हद्दीत घडली आहे. 


गेल्या काही काळापासून शेतकरी गांजाचे देखील चोरून पिक घेत असल्याच्या घटना सतत प्रकाशात येत आहेत. शेती परवडत नसल्याची ओरड शेतकरी सतत करीत आहेत तर काही शेतकरी शासन आणि प्रशासनाकडे गांजा लागवड करण्याची परवानगी देखील मागताना दिसून आले आहेत. काही मोजक्या शेतकऱ्यांनी गांजा लागवड करण्यासाठी परवानगी मागितली असली तरी अनेक शेतकरी चोरून गांजा लागवड करताना आढळून येत आहेत. कांद्याच्या पिकात अथवा उसाच्या पिकातून पोलिसांनी अनेकदा गांजाची झाडे हस्तगत केली आहेत. सोलापूर जिल्ह्यातही असे काही प्रकार उघडकीस आले असून आता पुन्हा मोहोळ तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. 


मोहोळ तालुक्यातील वटवटे येथे एका शेतात उसाच्या पिकात गांजासारख्या वनस्पतीची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली.  पोलिसांनी वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. वरिष्ठाकडून सूचना आणि पुढील आदेश मिळताच पोलिसांनी कामती पोलिसांच्या मदतीने ही कारवाई सुरु केली. नायब तहसीलदार, दोन पंच, वजनकाटा बरोबर घेवून पोलिसांचा मोर्चा माहिती मिळालेला उसाच्या शेतात दाखल झाला. उसाच्या पिकात पाहणी केली असताना गांजासदृश्य लहान मोठी झाडे लावलेली आढळून आली. पोलिसांनी ही झाडे मुळासह उपटून काढली आणि त्यांचा पंचनामा केला. 


पोलिसांनी उसाच्या पिकात धाड टाकल्यानंतर आणि येथे गांजासदृश्य वनस्पतींची अनेक झाले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली तसेच आजूबाजूचे शेतकरी देखील मोठ्या कुतूहलाने घटनास्थळी जमले. ऊसाच्या पिकातील हिरवागार गांजा पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. ( Cultivation of hemp in the sugarcane crop) पोलिसांनी गांजासह ४ लाख ४१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कारवाई सुरु केली आहे. ४५.१३० किलो वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !