BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ जून, २०२२

मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक, तरुणाचा मृत्यू !

 


सोलापूर : घरात मोबाईल चार्जिंगला लावत असताना चुकून वायर हाताला लागली आणि विजेचा शॉक बसून २४ वर्षे वयाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथे घडली. 


हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि या मोबाईलला चार्ज करण्याची गरज असते. मोबाईल जेवढा उपयुक्त आहे तितकाच तो धोकादायक असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मोबाईल बॅटरीचा स्फोट होणे, खिशातील मोबाईल अचानक पेटणे अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडल्या आहेत परंतु मंद्रूप येथील घटना काहीशी वेगळी असून प्रत्येकाने या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे. मोबाईल चार्जिंग करणे ही सामान्य बाब आहे परंतु थोडेसे दुर्लक्ष देखील जीवावर बेतते हेच या घटनेने दाखवून दिले आहे. घरात अनेकदा विजेचा धक्का बसतो परंतु त्याने फारसा धोका होत नाही. (Young man dies of electric shock)जवळपास सर्वानाच कधी ना कधी तरी घरात विजेचा शॉक बसलेला असतो परंतु अशा शॉकमुळे २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. 


मंद्रूप येथील हनुमान नगर येथे राहणारा २४ वर्षे वयाचा श्रीशैल गजानन सारोळे या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. घरात मोबाईल चार्जिंगला लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला. घरातील स्वीच बोर्डावरून बाहेर दिलेल्या कनेक्शनच्या वायरला पिन जोडलेली नव्हती त्यामुळे त्यातील एक वायर निघून श्रीशैल याच्या हातावर पडली आणि त्याला जोराचा विजेचा धक्का बसला. अचानक जोराचा करंट त्याच्या शरीरात गेला आणि तो जमीनीवर फेकला गेला. जमिनीवर पडल्यामुळे तो जखमी झाला. तातडीने या तरुणाला मंद्रूपच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यातही आले परंतु उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. 


तर प्राण वाचले असते !

बोर्डात वायर खुपसून कनेक्शन घेण्याचा असुरक्षितपणा टाळण्यात आला असता तर ही घटना घडली नसती. अनेक घरात बटण बोर्डातील प्लगमध्ये वायर खुपसून इतरत्र वीज कनेक्शन घेतलेले असते पण एका गाफील क्षणी हे किती घातक असते हेच या घटनेतून दिसून आले आहे. त्यामुळे असे प्रकार करताना सुरक्षितता बाळगणे अधिक महत्वाचे आहे. 


हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )





अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !