BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जून, २०२२

आषाढी वारीच्या गर्दीतही धावणार दुचाकी रुग्णवाहिका !

 


सोलापूर : आषाढी वारीच्या लाखोंच्या गर्दीतही वाट काढत दुचाकी रुग्णवाहिका धावणार असून गर्दीतही गरजू भाविकांना वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहे.  

पंढरीच्या चार प्रमुख यात्रांपैकी आषाढी वारी ही नेहमीच सर्वात अधिक गर्दीची असते, त्यात मागील दोन वर्षात कोरोनाच्या आक्रमणामुळे पंढरीची वारी लाखो लाखो भाविकांना साजरी करता आली नाही. यावर्षी कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या दडपणात का होईना पण पंढरीची आषाढी यात्रा होत आहे. आषाढीसाठी कसलेही निर्बंध लावले जाणार नसल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. मुंबई , पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आजही मोठी वाढ झाली आहे त्यामुळे आषाढी यात्रेबाबत स्थानिकातून चिंता व्यक्त होतच आहे. 


मागील दोन वर्षी आषाढी यात्रा न भरल्यामुळे यावर्षी आषाढीला विक्रमी गर्दी होणार हे उघडच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासन वेगाने कामाला लागले आहे. आषाढीसाठी येणाऱ्या भाविकांना आणि पालखी मार्गावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. यातच गर्दीतल्या भाविकांना वैद्यकीय मदतीची तातडीची गरज लागली तर 'बाईक अँब्युलन्स' ची आगळी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


आषाढीनिमित्त पंढरीत सर्वच रस्त्यावर मोठी गर्दी होते आणि काही ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होत असते. अशा घटना घडून नये म्हणून प्रशासन दक्ष असते परंतु दुर्दैवाने काही घडलेच तर प्रचंड गर्दीमुळे तातडीने संबंधिताला रुग्णालयात हलविणे कठीण असते. सर्वच मार्गावर केवळ भाविकांची गर्दी असते आणि ती हटवून मार्ग काढणे कठीण आणि वेळखाऊ बाब असते. वारीवेळी कसलेही वाहन शहरातील रस्त्यावरून ये जा करीत नसते. अशा वेळी रुग्णवाहिका धावणे ही देखील अवघड बाब असते आणि त्यामुळे गरज असलेल्या  रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोहोचविणे हे आव्हानात्मक असते. परंतु आता 'बाईक ऍम्ब्युलन्स' ची सुविधा पुरविण्यात येणार असून ही दुचाकी गर्दीतूनही वाट काढत रुग्णापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याला वैद्यकीय सुविधा मिळवून देणार आहे. 


पस्तीस बाईक अँब्युलन्स 
यावर्षीच्या आषाढी वारीसाठी तब्बल ३५ बाईक अँब्युलन्स उपलब्ध केल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. यामुळे गर्दीत एखादा रुग्ण अत्यवस्थ असेल तर त्याला तातडीने उपचार मिळणार आहेत. (Two-wheeler ambulance will also run in the crowd of Ashadhi)यावर्षी आषाढी यात्रेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून बाईक अँब्युलन्स अंत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

 
सेवेकऱ्याची तपासणी 
पालखी सोहळ्यात अनेक स्थानिक सेवेकरी भाविकांची विविध प्रकारे सेवा करीत असतात. या सेवेकऱ्यांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या असून सदर सेवेकऱ्यांचे आरोग्य तपासून त्यांना टी शर्ट दिले जाणार आहेत   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !