BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जून, २०२२

मान्सून पुन्हा लांबणीवर, शेतकऱ्याचे डोळे आकाशाकडे !

 



मोसमी पावसाने आणि हवामान विभागाच्या अंदाजाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली असून मान्सून आणखी लांबणीवर पडला आहे. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा नवी तारीख दिली आहे. 


यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता आणि शेतकरी आनंदाला होता. लवकर आणि भरपूर पाउस येणार म्हणून शेतीची कामे उरकण्यासाठी शेतकरी लगबग करीत राहिला. शेतीची कामे जवळपास आता पूर्णत्वास आली असून पावसाची प्रतीक्षा लागली आहे पण नियमित वेळ आली तरी देखील मोसमी पाउस अजूनही राज्यात पोहोचला नाही त्यामुळे शेतकरी आता निरभ्र आभाळाकडे पहात पावसाची प्रतीक्षा करीत आहे. 


यंदाच्या पावसाने मोठी आशा तर निर्माण केलीच आहे पण वेळेच्या आधी तो दाखल होण्याचा अंदाज फसला गेला आहे. अंदमान आणि केरळमध्ये तो वेळेच्या आधी आला त्यामुळे आता काही दिवसातच, अर्थात वेळेच्या आधी महाराष्ट्रात दाखल होणार याची आशा होती आणि हवामान विभागाकडून देखील तसे सांगण्यात आले होते. मोसमी माउस कर्नाटकात पोहोचला आणि तेथेच विसावला. महाराष्ट्रात दाखल होण्याच्या त्याच्या तारखा सतत पुढे जात राहिल्या. महाराष्ट्रात साधारणपणे ७ जून रोजी मान्सूनच्या पहिल्या सरी येत असतात पण यावर्षी मान्सूनचे ढग दूरच राहिलेले आहेत. 


येणार येणार म्हणून गाजावाजा झालेला मान्सून कर्नाटक, गोव्याच्या सिमेतच रेंगाळला आहे. अनुकूल वातावरण निर्माण झाल्यास तो १२ अथवा १३ जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात वातावरण बदलले आहे, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान कायम आहे शिवाय अधूनमधून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी देखील येत आहेत पण मान्सून काही महाराष्ट्रात येत नाही (The monsoon has been extended further)त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊ लागला आहे.


पावसाला अडथळा !

नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यात अडथळा निर्माण झालेला असून त्यामुळे तो महाराष्ट्राच्या वेशीवरच रेंगाळला आहे. आता मान्सूनसाठी नवा मुहूर्त सांगितला जात असून १२ अथवा १३ जून रोजी तो महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !