BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जून, २०२२

बारावी पास होऊनही विद्यार्थिनीची आत्महत्या !

 


दहावी बारावी परीक्षेत नापास झाल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याच्या अनेक घटना समोर येतात परंतु बारावीची परीक्षा पास होऊन देखील निराश झालेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 


दहावी आणि बारावीच्या परीक्षेला महत्व आहे पण प्राणापेक्षा महत्वाचे काहीही नसते. तरी देखील विद्यार्थी खचून आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलतात आणि आपले जीवन संपवतात. दहावी बारावी नापास झालेले नंतर डॉक्टर, आयपीएस अधिकारी झाल्याच्या घटना आहेत. परंतु नापास झाले म्हणजे आयुष्यातील सगळे काही संपले असे समजून काही विद्यार्थी आत्महत्या करतात. नापास झाल्यामुळे येणाऱ्या निराशेतून अशा घटना घडतात पण भंडारा जिल्ह्यात बारावीच्या एका विद्यार्थिनीने परीक्षेत पास होवूनही आत्महत्या केली (Student Passed exam but Suicide)त्यामुळे पालकवर्गात अधिक चिंता निर्माण झाली आहे. 


गेल्या काही वर्षांत कुठल्याही परीक्षेत मुलांपेक्षा मुलीचा वरचढ ठरतात. मुलांना मागे टाकत मुली सर्वाधिक बाजी मारतात. बारावीचा निकाल कालच घोषित झाला. आणि लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी वंजारी ही पास झाली होती. परीक्षेत पास झाल्यानंतर आनंद होणे हे स्वाभाविकच आहे पण मयुरीने हा आंदन व्यक्त करण्याऐवजी थेट आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलले आणि तिच्या कुटुंबासह तिला ओळखणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला. तांदळाला अळी लागू नये म्हणून लावण्याचे विषारी पावडर खाऊन तिने आपले जीवन संपवले. बारावीच्या परीक्षेत तिला ५५ टक्के गुण मिळाले होते परंतु तिच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली होती.  घरातील विषारी पावडर तिने खाल्ली आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला. 


गुण पाहून धक्का ! 
बारावीचा निकाल आल्यानंतर तिला ५५ टक्के गुण मिळाले असल्याचे दिसले. पास झाल्याचा तर आनंद आजीबात नव्हता कारण मिळालेले गुण तिच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. एवढ्या कमी मार्कावर आपण पुढे काय करणार आणि आई वडिलांसाठी आपण काहीच करू शकत नाही अशा प्रकारच्या नकारात्मक विचाराने तिला घेरले आणि तिने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.


उपचार केले पण --
मयुरीने विषारी पावडर खाल्ल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण प्रकृती चिंताजनक होऊ लागल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले पण उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला आणि अवघा जिल्हा हळहळला. कुटुंबाला तर मोठा धक्का बसलाच पण मित्र मैत्रिणी, शिक्षक या सगळ्यांनाच मोठा हादरा बसला.  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !