BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जून, २०२२

बारा वर्षाच्या मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला !




माळशिरस : अवघ्या बारा वर्षे वयाच्या मुलीचे लग्न केले जात असल्याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी गतीने हालचाल केली आणि लग्न सोहळ्याच्या आधीच दोन दिवस हा बालविवाह रोखला गेला.

सोलापूर जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण वाढत असून एकाच आठवड्यात पंढरपूर तालुक्यात दोन बालविवाह उरकण्यात आले आणि दोन्ही प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खर्डी येथील बालविवाह प्रकरणी सुमारे दोनशे तर आंबेचिंचोली येथील बालविवाह प्रकरणी पन्नास ते साठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान माळशिरस पोलिसांनी देखील एक बालविवाह होण्यापूर्वीच रोखला आहे. माळशिरस तालुक्यातील कन्हेर येथील अवघ्या बारा वर्षे वयाच्या मुलीचा विवाह दहिवडी येथील १९ वर्षे वयाच्या मुलासोबत निश्चित केल्याची बातमी पोलिसांच्या कानापर्यंत धडकली आणि पोलीस लगेच पुढील कामाला लागले. (Police stoped minor girl's marriage) कन्हेर येथेच ११ जून रोजी हा विवाह आयोजित करण्यात आला होता परंतु तत्पूर्वीच पोलीस धडकले 

महिला पोलिसांमार्फत बारा वर्षे वयाच्या मुलीकडे तसेच तिच्या आई वडिलांच्याकडे लग्नाबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोलिसांना सत्य माहिती समजली. बारा वर्षे वयाच्या मुलीचा विवाह केला जाणार होता याची खात्री पोलिसांना झाली आणि त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली. पोलिसांनी सदर बालिकेस महिला व बाल कल्याण संरक्षण समितीपुढे हजर करण्यात आले आहे. केवळ बारा वर्षे वय असलेल्या मुलीचा विवाह करण्यात येत होता ही बाब अनेकांना खटकली असून या न झालेल्या विवाहाची माळशिरस तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !